स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना(political consulting firms) आणि राज ठाकरेंची मनसे यांची युती होणं जवळपास निश्चित आहे. दरम्यान राज ठाकरेंना विरोध झाल्यास उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडू शकतात असंही बोललं जात आहे. यादरम्यान शरद पवार यांनी शिवसेना-मनसेच्या अपेक्षित युतीवर भाष्य केलं आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं. तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 75 व्या वाढदिवानंतर राजकारण थांबवावं का? यावरही मत मांडलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत(political consulting firms) सर्व ठिकाणी मविआची युती असेल असं नाही. स्थानिक समीकरणं पडताळून निर्णय घेतला जाईल असं शरद पवारांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू, असंही स्प्ट केलं. उद्धव आणि राज ठाकरेंच्या संभाव्य युतीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी म्हटलं की, “ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद आहे. मुंबई,ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही’.
‘नरेंद्र मोदींना सांगण्याचा नैतिक अधिकार नाही’
शरद पवारांनी यावेळी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचाही उल्लेख केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणात अशा प्रसंगी कटुता ठेवू नये. आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारानुसार आम्ही वागणारी माणसं आहोत,” असं ते म्हणाले.
“माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी त्यावेळी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही,” असंही शरद पवार सांगितलं. तसंच त्यांच्या निवृत्तीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असं सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही. मी 75 वर्षानंतरही राजकारण करत आहे. कोणी निवृत्त व्हावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे”.
‘राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची वाट बघतोय’
“खासदारांसोबत बैठकीलाही अटी तटी घालणं योग्य नाही. राहुल गांधी मतदारसंघनिहाय काय गडबड झाली ते सांगतायत. राहुल गांधींच्या आरोपानंतर आयोगानं आपली विश्वासार्हता वाढवावी. राहुल गांधींच्या आरोपानंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नाही. निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास आयोगानं वाढवावा. राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघतोय,” असं शरद पवारांनी सांगितले.
हेही वाचा :
सोनीवर नाही तर कुठे पाहू शकता भारत-ओमान सामना?
दहा दिवसात लालपरी झाली मालामाल! गणेशोत्सवाच्या काळात एसटीला मिळाले…
कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी