आशिया कप 2025 मध्ये भारताचा पुढचा सामना(match) ओमानविरुद्ध होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी अबुधाबी येथे खेळला जाणारा हा लीग स्टेजमधील शेवटचा सामना असेल. त्यानंतर सुपर-4 फेरीसाठी शर्यत आणखी रंगणार आहे. भारत-ओमान सामना कुठे आणि किती पैशात पाहता येईल, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

आशिया कप 2025 चे टीव्ही प्रसारणाचे हक्क सोनीकडे आहेत. त्यामुळे तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर हा सामना(match) पाहू शकता. हिंदी, इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्येही कमेंट्रीची सुविधा दिली जाते. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी सोनी लिव अॅप डाउनलोड करावे लागेल. मात्र, त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
ज्यांना सोनी लिव वापरायचे नसेल, त्यांच्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे FanCode अॅप. हे कोणतेही टीव्ही चॅनल नसून मोबाईलवर डाउनलोड करता येणारे अॅप आहे. फॅनकोडने सोनीकडून अधिकृत हक्क घेतले आहेत. संपूर्ण टूर्नामेंट पाहण्यासाठी 189 रुपये मोजावे लागतील. पण जर एखादा सामना स्वतंत्रपणे पाहायचा असेल, तर त्यासाठी कमी किंमत आकारली जाते.
19 सप्टेंबर रोजी अबुधाबीमध्ये होणारा भारत-ओमान सामना तुम्ही फक्त 30 रुपयांत पाहू शकता. फॅनकोडवर सध्या हा दर लागू आहे. नंतर किंमतीत थोडा फरक होऊ शकतो, पण मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे. स्मार्ट टीव्हीवरही फॅनकोड डाउनलोड करून पेमेंट करून सामना सहज पाहता येईल.
थोडक्यात सांगायचे झाले तर, भारतीय संघाचा हा महत्त्वाचा सामना पाहण्यासाठी तुम्हाला मोठा खर्च करावा लागणार नाही. काहीशा छोट्या रकमेतच आशिया कपचा थरार अनुभवता येणार आहे.
हेही वाचा :
दहा दिवसात लालपरी झाली मालामाल! गणेशोत्सवाच्या काळात एसटीला मिळाले…
भर रस्त्यात नवरा-बायकोचे जोरदार भांडण; पत्नीने पतीला धू, धू, धुतलं…, Video Viral
बेरोजगारांसाठी खुशखबर! निवडणुकीआधी ‘या’ सरकारची नवी खेळी, युवकांना दरमहा 1000 रूपये अन्…