सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ(Video)व्हायरल होत असतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. लोक कधीही, कुठेही भांडायला सुरुवात करतात. त्यांना आसापासच्या परिसराचे अजिबात भान राहत नाही, गेल्या काही काळात नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये बायको नवऱ्याला बेदम मरहाण करताना दिसत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ(Video) उत्तर प्रदेशाच्या मेरठमधील आहे. कोर्टाबाहेर आणि पोलिस लाईनबाहेर भर रस्त्यात नवरा-बायकोची शाब्दिक वादावादी सुरु होती. पण वाद इतका वाढला की पत्नीने पतीला भर रस्त्यात मारहाण सुरु केली. मिळलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसही पोहोचले होते. त्यांनी त्यांचे भांडण मोठ्या मुश्लिकीलीने मिटवले. या भांडणाचे कारण पोलिसांनी स्पष्ट केले नाही, केवळ घरगुती वादातून भांडण झाले होत असे सांगितले. यामुळे त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हाही दाखल करण्यात आलेलाल नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भर रस्त्यात दोन्ही नवरा-बायको भांडताना दिसत आहे. बायकोने नवऱ्याची कॉलर धरली आहे. त्याला कानाखील सटासट मारत आहे. नवरा बायकोपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर लोकांची गर्दी जमलेली दिसत आहे. काहीजण भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरुणी काही ऐकायला तयार नाही. हे सगळे दृश्य गर्दीतीलच एका व्यक्तीने कॅमेरात कैद केले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DeepikaBhardwaj या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आधी नवरा बायकोला मारयाचा आता उलटे झाले आहे, मॉर्डन समाज असे म्हटले आहे. तर दुऱ्या एकाने एका जोरदार कानशिलात मारा दोघांचा लगेच भांडण मिटेल असे म्हटले आहे.

हेही वाचा :

राज कुंद्राने घेतली नवी नावं; कोट्यवधींच्या घोटाळ्यात बिपाशा-नेहाचा उल्लेख

बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडून नवऱ्याला कारमध्ये कोंबून किडनॅप करण्याचा थरारक प्रयत्न, पण…

बेरोजगारांसाठी खुशखबर! निवडणुकीआधी ‘या’ सरकारची नवी खेळी, युवकांना दरमहा 1000 रूपये अन्…