अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ‌?.

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी …..

एखाद्या व्यवस्थेवरचा विश्वास (Satyagraha) वाढवायचा असेल तर तिच्या असण्याबद्दल चे फायदे अधोरेखित करावै लागतात. तथापि विश्वास वाढीसाठी एखाद्या प्रचलित व्यवस्थेविरुद्ध सत्याग्रह करता येईल काय? या प्रश्नाचे उत्तर आम आदमी पक्षाचे संस्थापक, नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्याग्रह करणार असे दिले आहे. त्यामुळे नवी दिल्लीत, पंजाब मध्ये नजीकच्या काही दिवसात न्यायपालिकेविरुद्ध सत्याग्रह सुरू होईल. देशात हे पहिल्यांदा घडते आहे असे म्हणता येईल.

लोकशाही पद्धतीने तेवर (Satyagraha) आलेल्या राज्यकर्त्यांना शासन धोरण ठरवण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करून अरविंद केजरीवाल यांनी तेव्हा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून मध्य धोरण जाहीर केले पण त्यामध्ये आर्थिक घोटाळा झाला असल्याचा ठपका ठेवून ईडीने फौजदारी स्वरूपाची कारवाई केली. अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया वगैरे मंडळींना अटक करून तुरुंगात घातले.

कनिष्ठ न्यायालयाने मात्र ईडीची (Satyagraha) ही कारवाई चुकीची ठरवून सर्वांना दोष मुक्त केले. म्हणजे त्यांच्या विरुद्ध खटलाचं चालवला गेला नाही. कनिष्ठ न्यायालयाच्या या कृतीला नवी दिल्ली उच्च न्यायालया च्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांनी स्थगिती दिली आणि आता त्याची फेर सुनावणी होणार आहे. पहिल्या सुनावणीच्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांच्यावरच काही आक्षेप घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित संस्थेच्या कार्यक्रमाला न्यायमूर्ती स्वर्ण कांता या उपस्थित होत्या.

त्या संघ विचारांशी संबंधित (Satyagraha) आहेत. म्हणूनच त्यांच्याकडून मला न्याय मिळणार नाही. त्यांनी आमच्याविरुद्धचा खटला सोडावा किंवा इतर न्यायालयात वर्ग करावा असे न्यायालयात उपस्थित राहून सांगितले. त्यानंतर काही दिवसांचा कालावधी गेला. सुनावणीच्या दुसऱ्या तारखेला दस्तुरखुद्द न्यायमूर्ती स्वर्णकांता यांनी मध्य घोटाळा विषयक खटल्यापासून मी अलिप्त होऊ इच्छित नाही. खटल्याची सुनावणी माझ्यासमोरच होईल अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. ‌

न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्याकडून (Satyagraha) आपणाला उचित न्याय मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे मी स्वतः किंवा माझ्या वकिलांच्या माध्यमातून नवी दिल्लीच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांच्यासमोर हजर होणार नाही. माझी ही भूमिका सर्वसामान्य जनतेचा न्यायालयावरील विश्वास वाढावा यासाठीची आहे असा खुलासा करण्यास ते विसरले नाहीत. महात्मा गांधी यांच्या विचारांवर माझा दृढ विश्वास आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने मी आता जाणार आहे. सत्याग्रह करणार आहे असे त्यांनी सांगितले असल्यामुळे आता त्यांच्या आपल्या पक्षाच्या वतीने नवी दिल्लीसह काही ठिकाणी सत्याग्रह केला जाईल.

कोणाही व्यक्तीला कोणाही (Satyagraha) संघटनेला किंवा राजकीय पक्षांना लोकशाही पद्धतीने सत्याग्रह करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण हा अधिकार न्यायपालिकेच्या विरुद्ध पहिल्यांदाच अरविंद केजरीवाल यांच्याकडून वापरला जाणार आहे. त्याचे नेमके परिणाम काय होतील हे त्याच वेळेस स्पष्ट होणार आहे. कदाचित न्यायालयाचा अवमान या दृष्टीनेही या सत्याग्रहाकडे पाहिले जाऊ शकते. वास्तविक अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयातील सुनावणीला सामोरे जाऊन तिथे त्यांच्याविरुद्ध निकाल दिला गेला तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेता आली असती.

मी न्यायालयात हजर होणार नाही (Satyagraha) , माझ्या वतीने बचाव करण्यासाठी कोणताही वकील नेमणार नाही ही त्यांची भूमिका काहीशी अवाजवी वाटते.उच्च न्यायालयाने या प्रकरणात एकतर्फी निर्णय घेतला तरी चालेल ही भूमिका चुकीची आहे. या अशा भूमिकेच्या माध्यमातून त्यांना सर्वसामान्य जनतेपर्यंत कोणता संदेश पोहोचवायचा आहे हे कळावयास मार्ग नाही. एकूणच अरविंद केजरीवाल यांनी समाजातील सर्व प्रकारच्या अव्यवस्थेचा, भ्रष्टाचाराचा वाढलेला कचरा साफ करावयाचा होता आणि म्हणूनच त्यांनी आम आदमी पक्षासाठी”झाडू”हे निवडणूक चिन्ह घेतलेले आहे. पण त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. मुख्यमंत्र्यांच्या आलिशान निवासस्थानासाठी करोडो रुपयांचा खर्च केला गेल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

अरविंद केजरीवाल किंवा (Satyagraha) त्यांचा पक्ष हा अडचणीत आलेला असतानाच आता या पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार एकाच वेळी भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत. हा मोठा झटका आप साठी असल्याचे बोलले जाते. आता या सात खासदारांचे पक्षांतर हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर यावर चर्चा सुरू होईल. आता या सात खासदारांच्या पक्षांतराच्या विरोधात अरविंद केजरीवाल हे महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने जाणार आहेत का? कारण सत्याग्रहाच्या माध्यमातूनच आपणाला न्याय मिळेल असा त्यांचा विश्वास आहे.