पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

‌ कोणत्याही देशाचा राष्ट्राध्यक्ष, (system)पंतप्रधान असो,त्याला सर्वोच्च पातळीवरचीसुरक्षा व्यवस्था दिली जाते. भारतामध्ये तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना “नील पुस्तिके “तीलमार्गदर्शक नियमावलीप्रमाणे सुरक्षा व्यवस्था प्रदान केलेली असते. एकूणच सर्वोच्च पातळीवरील नेत्यांसाठी असलेली पोलादी सुरक्षा व्यवस्था कधीकधी भेदली जाते. त्याचे प्रत्यंतर अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन मध्ये नुकतेच आले.

अमेरिका हे बलाढ्य राष्ट्र. (system)अमेरिकेला जागतिक पोलीस म्हणूनही संबोधले जाते. तेथील राष्ट्राध्यक्षांच्या बंदोबस्ताबद्दल, सुरक्षिततेबद्दल कोणत्याही प्रकारची अगदी सुईच्या अग्रा एवढी सुद्धा तडजोड केली जात नाही. एक प्रकारची पोलादी सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात असते. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी व अन्य व्हीआयपी वॉशिंग्टन मधील एका आलिशान सप्त तारांकित हॉटेलमध्ये डिनर साठी एकत्र आले होते. त्याआधी एक छोटासा कार्यक्रमही तेथे आयोजित करण्यात आला होता.

या हॉटेलच्या भोवती अनेक(system) स्तरावरची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. अगदी वारा सुद्धा हॉटेलमध्ये जायला घाबरून जाईल अशी एकूण चोख सुरक्षा व्यवस्था होती. व्यवसायाने शिक्षक असलेला एक तरुण त्याचं नाव कोल्ड थॉमस हा या हॉटेलची पोलादी सुरक्षा व्यवस्था भेदून किंवा या व्यवस्थेला चकवा देऊन तो त्या हॉटेलमध्ये घुसला. डोनाल्ड ट्रम्प व अन्य व्हीआयपी साठी ज्या हॉलमध्ये डिनर आयोजित केले होते त्याच परिसरात कोल थॉमस या तरुणाने बंदुकीतून पाच गोळ्या झाडल्या.

ट्रम्प यांना टार्गेट करण्याचा त्याचा(system) प्रयत्न होता पण सिव्हिल ड्रेस मधील सुरक्षा रक्षकांनी कोल थॉमस याच्यावर झडप घातली आणि त्याचवेळी इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भोवती कडे करून त्यांना हॉटेलमधील सुरक्षित ठिकाणी नेले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरचा हा तिसरा किंवा चौथा हल्ला समजला जातो. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना एका प्रचार सभेत त्यांच्यावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती.

चित्रपट अभिनेते रोनाल्ड रिगन(system) हे अमेरिकेचे अध्यक्ष असताना ते याच हॉटेलमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित असताना सुरक्षा व्यवस्था भेदून आत मध्ये आलेल्या एका माथेफिरूने त्यांच्यावर गोळी झाडली होती आणि त्यामध्ये राष्ट्राध्यक्ष रीगन जखमी झाले होते. सर्वोच्च स्थानी असलेल्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रकार यापूर्वी अनेक देशांमध्ये घडले आहेत. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर मानवंदना देणाऱ्या एका सैनिकाने बंदुकीचा दस्ता त्यांच्या मानेवर मारला होता.

इजिप्त चे तत्कालीन राष्ट्र(system) प्रमुख अन्वर सादत हे सैनिकांच्याकडून मानवंदना घेत असतानाच एका सैनिकाने त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. आयर्न प्राईम मिनिस्टर म्हणून ओळख असलेल्या पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्यावर त्यांच्या अंगरक्षकांनी बेछुटपणे गोळीबार करून त्यांची हत्या केली होती.

पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष यांना देण्यात (system)येत असलेली सुरक्षा व्यवस्था ही पोलादी मानली जाते. भारतामध्ये तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवायची याबद्दल मार्गदर्शन करणारी ब्ल्यू बुक नील पुस्तिका असते. त्यातील तरतुदी प्रमाणे सुरक्षा व्यवस्था राबवली जाते. पंतप्रधानांचे निवासस्थान, महामहीम राष्ट्रपती यांचे निवासस्थान आणि तत्सम महनीय व्यक्तींच्या निवासस्थानाभोवती 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली असते.

तर सर्वोच्च नेत्यांच्या दौऱ्यावरची (system)व्यवस्था अतिशय खडक असते. पंतप्रधानांचा एखादा सार्वजनिक कार्यक्रम आहे, जाहीर सभा आहे, त्या ठिकाणी एखाद्या तरुणा जवळ किंवा इसमाजवळ साधा चाकू जरी सापडला तरी तो पंतप्रधानांची हत्या करण्याच्या हेतूनेच आला होता असे गृहीत धरून त्याच्यावर कारवाई केली जाते. पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींचा वाहनांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार असतो तो मार्ग ताफा येण्याच्या आधी किमान दोन तास निर्मनुष्य केला जातो.

कारण सुरक्षा व्यवस्था कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही.डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित असलेल्या हॉटेलच्या आवारात ज्याने गोळीबार केला तो कोण होता? त्याचा हेतू कोणता होता? इराण युद्धाशी संबंधित हेतू होता काय? याची चौकशी होईल. पोलादी सुरक्षा व्यवस्था भेदून तो आत मध्ये कसा आला याची ही चौकशी होईल.पण सर्वोच्च पातळीवरची सुरक्षा व्यवस्था भेदता येते, तिला चकवा देता येतो हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता भारतासह जगातील सुरक्षा व्यवस्था त्याचा धडा घेतील.