बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर सुरू असलेल्या ६० कोटी रुपयांच्या फसवणूक(scam) प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. चौकशीदरम्यान राज कुंद्राने बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्री बिपाशा बासू आणि नेहा धुपिया यांची नावं घेतली आहेत.

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) राज कुंद्राची पाच ते सहा तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने उघड केलं की 60 कोटींपैकी काही रक्कम बिपाशा आणि नेहाला फी म्हणून देण्यात आली होती. मात्र, अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर तो मौन बाळगून राहिला. त्यामुळे त्याची आणखी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान कंपनीच्या खात्यांमधून शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू आणि नेहा धुपियासह चार अभिनेत्रींच्या खात्यांमध्ये थेट पैसे हस्तांतरित करण्यात आल्याचे आढळून आले आहे. याशिवाय बालाजी एंटरटेन्मेंटसोबतही काही संशयास्पद व्यवहार(scam) झाले का, याचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंतच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला तब्बल 25 कोटी रुपयांच्या थेट ट्रान्सफरचे पुरावे मिळाले आहेत.

चौकशीत हेही समोर आलं की नोटाबंदीनंतर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर रोख पैशांच्या कमतरतेचा मोठा परिणाम झाला होता. त्यादरम्यान इतर खात्यांमध्ये काही संशयास्पद निधी हस्तांतरित करण्यात आले होते. त्याचे ठोस पुरावे आता EOW कडे आहेत.

या प्रकरणाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाली होती. शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल करत, 2015 ते 2023 या कालावधीत 60 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप केला होता.

तक्रारीनुसार, शिल्पा आणि राज यांनी व्यवसाय वाढवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले, मात्र ते पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले गेले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून, पुढील काही दिवसांत आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

कोण करतंय असलं “लाल” रंगाच गलिच्छ राजकारण..?

आनंदाची बातमी! 22 सप्टेंबरपासून ‘या’ वस्तू स्वस्त होणार

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली अन्…