सणासुदीच्या(festival) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून देशभरात नवे जीएसटी दर लागू होणार असून इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह दैनंदिन वापरातील अनेक उत्पादनं स्वस्त होणार आहेत. या बदलामुळे ग्राहकांना थेट 10% पर्यंत बचत होणार आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर 10% पर्यंत बचत :
सरकारने टीव्ही, फ्रिज, एसी यांसारख्या घरगुती वापरातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी केला आहे. यामुळे ग्राहकांना 500 ते 2000 रुपयांपर्यंतचा आर्थिक फायदा होऊ शकतो. या कपातीमुळे सणासुदीच्या(festival) खरेदीत मोठी बचत होणार आहे.
कोणत्या वस्तू होणार स्वस्त? :
टीव्ही, एसी, कूलर, पंखे
डिशवॉशर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन
व्हॅक्यूम क्लीनर, मायक्रोवेव्ह ओव्हन
इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर, हेअर ड्रायर, ट्रिमर
दैनंदिन वापरातील वस्तूंवरही दिलासा
साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, हेअर ऑईल यांसारख्या 99% वस्तूंचा जीएसटी दर 12% वरून 5% करण्यात आला आहे. म्हणजेच घरगुती बजेटवर थेट दिलासा मिळणार आहे.
जीएसटी व्यवस्थेत मोठा बदल :
जीएसटी परिषदेने 12% आणि 28% कर श्रेणी पूर्णपणे रद्द केल्या आहेत. आता देशभरात फक्त दोन मुख्य दर राहतील –
5% (दैनंदिन वापरातील वस्तूंसाठी)
18% (इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी)
लक्झरी वस्तूंवर नवीन स्लॅब
याशिवाय, लक्झरी आणि काही निवडक वस्तूंसाठी 40% चा नवीन जीएसटी स्लॅब लागू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि लक्झरी वस्तूंच्या दरांमध्ये स्पष्ट फरक दिसून येईल.
हेही वाचा :
कोण करतंय असलं “लाल” रंगाच गलिच्छ राजकारण..?
सातवीच्या मुलीचा मृतदेह तब्बल 20 दिवसांनी सापडला; निष्पाप जीवाचे तुकडे तुकडे केले अन्…