कॉलेज तरुणींशी मैत्री, नंतर लॉजवर नेऊन 10 जणींचे व्हिडिओ काढले कोल्हापुरातील फार्मसीच्या तरुणाचे बिंग कसे फुटले?

अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पीडित इतर तरुणींनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन केले असून त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

कोल्हापूर: अमरावती आणि नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल प्रकरणांचा तपास सुरू असतानाच, आता कोल्हापूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद समीर सनदे (वय 22) या तरुणाने अनेक निष्पाप तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, (college girls) त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, यामागे एखादी संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहिद सनदे हा फार्मसीचे शिक्षण घेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी मैत्री केली आणि (college girls) त्यांना प्रेमाच्या किंवा भावनिक जाळ्यात ओढले. त्यानंतर, कोल्हापूर आणि शिरोली येथील लॉजवर नेऊन त्याने तरुणींवर अत्याचार केले आणि त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रित केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो तरुणींचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत होता. पीडित तरुणीने हिंमत दाखवून राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने हा नराधमाचा काळा चेहरा समाजासमोर आला.

या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद सनदे याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली असून, पेठवडगाव न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, शाहिदने पीडित तरुणीचे व्हिडीओ आपल्या एका मित्रालाही शेअर केले होते. हा साथीदार सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, शाहिदच्या ताब्यात 8 ते 10 तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडीओ असण्याची शक्यता आहे, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.

या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय सकल हिंदू समाजासह विविध संघटनांनी घेतला होता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल आणि मुस्लिम समाजाच्या वतीनेही या घटनेचा निषेध नोंदवत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (college girls) शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याला निवेदने देत, स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा विकृत मानसिकतेच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा

अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण

धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं