बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे. 90 च्या दशकात त्याने एकापाठोपाठ अनेक हिट चित्रपट(film) दिले आणि तेव्हापासूनच त्याची लोकप्रियता वाढू लागली. मात्र त्याच काळात आलेल्या ‘माया मेमसाब’ या चित्रपटामुळे शाहरुख एका मोठ्या वादात अडकला होता.

सध्याच्या काळात चित्रपटांमधील(film) बोल्ड किंवा इंटीमेट सीन सामान्य मानले जातात. पण 90 च्या दशकात ते प्रचंड चर्चेचा विषय ठरत होते. ‘माया मेमसाब’मध्ये शाहरुख खानने ललित ही भूमिका केली तर अभिनेत्री दीपा साही मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात दोघांना अनेक बोल्ड आणि इंटीमेट सीन द्यावे लागले.
चित्रपटाच्या(film) शूटिंगदरम्यान एका वृत्तपत्रात बातमी छापली गेली की, दिग्दर्शकाने शाहरुख आणि दीपा यांना एकमेकांशी मोकळे व्हावे म्हणून हॉटेलमध्ये एकत्र ठेवले. इतकंच नव्हे तर या आर्टिकलमध्ये असा दावा करण्यात आला की, त्यांनी रात्री एकत्र वेळ घालवला आणि दुसऱ्या दिवशी बोल्ड सीन दिला. यामध्ये शाहरुखने न्यूड सीन दिल्याचंही लिहिलं गेलं.
ही बातमी कोणत्याही बायलाइनशिवाय (लेखकाचं नाव नसलेली) छापली गेल्याने ती कोणी लिहिली हे समजू शकले नाही. मात्र ही बातमी वाचून शाहरुख खान संतापला. काही काळानंतर शाहरुख खान एका इव्हेंटला गेला असता तो त्या वृत्तपत्राच्या संपादकांना भेटला. तेव्हा संतप्त शाहरुखने त्या पत्रकाराला सगळ्यांसमोर सुनावलं आणि त्याला धमक्याही दिल्या.
या प्रकरणानंतर त्या पत्रकाराने मुंबई पोलिसांत शाहरुखविरोधात तक्रार दाखल केली आणि स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली. कारण धमकी सार्वजनिकरीत्या दिली गेली होती आणि त्याचे पुरावेही पोलिसांकडे होते. यामुळे पोलिसांनी शाहरुख खानला अटक केली आणि त्याला बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये नेलं.
त्या काळात शाहरुख आधीच मोठा स्टार बनला होता. त्यामुळे त्याला दीर्घकाळ तुरुंगात राहावं लागलं नाही. अभिनेता चिक्की पांडे यांनी त्याला जामिनावर सोडवून घेतलं असं म्हटलं जातं.
‘माया मेमसाब’ या चित्रपटाने शाहरुखच्या कारकिर्दीत नवे वळण आणलं. एकीकडे अभिनयासाठी त्याला धाडस दाखवावं लागलं तर दुसरीकडे वाद, तक्रारी आणि अटक यामुळे त्याला कठीण प्रसंगालाही सामोरं जावं लागलं. पण या सर्व घटनांनंतरही शाहरुख खानने हार मानली नाही आणि आजही तो बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा :
सोनीवर नाही तर कुठे पाहू शकता भारत-ओमान सामना?
दहा दिवसात लालपरी झाली मालामाल! गणेशोत्सवाच्या काळात एसटीला मिळाले…
कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी