बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ने जुलै महिन्यात आपल्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू केला, जेव्हा तिने एक चिमुकल्या मुलीला जन्म दिला. नुकत्याच तिने चाहत्यांना तिच्या मातृत्वाच्या प्रवासाची झलक दिली, तीने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. या रीलमध्ये प्रसिद्ध गायिका रिहाना मातृत्वाबद्दल मनमोकळेपणाने बोलते आणि सांगते की, ‘आई(mother) होणे हे आयुष्यातील सर्वात कठीण काम आहे.’

बुधवारी कियारा अडवाणीने इन्स्टाग्राम स्टोरीवर ही रील शेअर केली, ज्यात रिहानाने आपल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे आणि तिला तिच्या आईबद्दल आदर कसा वाढला हे देखील व्यक्त केले. आतापर्यंत कियारा या नव्या जीवनाच्या टप्प्याबद्दल सार्वजनिकपणे बोललेली नाही; मात्र या रीलद्वारे तिने चाहत्यांना तिच्या मनस्थितीची हलकीशी झलक दिली आहे.
रीलमध्ये रिहानाचे शब्द होते ‘आई होणे हे बहुधा आयुष्यातील सर्वात कठीण काम आहे. माझे काम आव्हानात्मक वाटते, पण आई होण्याच्या कामासमोर ते काहीही नाही. मी नेहमी म्हणते, आई, मी तुझा आदर करते.’
रिहानाने पुढे सांगितलं ‘मला तुझ्यावर प्रेम आहे, छान काम केलेस, आपण मोठे झालो की आपण विसरतो की आईने हे सगळं इतके सहज आणि नैसर्गिकपणे केलं आहे . मला आठवत नाही की माझी आई(mother) कधी आजारी होती… कधीही तिच्या अनुपस्थितीची आठवण ठेवत नाही. आता आपण प्रौढ झाल्यावर आपण म्हणतो, व्वा, ती सुपरह्युमन आहे… तिने कमी साधनांमध्ये हे सर्व केले आणि ते इतके सहज दिसले.

मी तिच्याकडे नेहमीच पाहत होते, लहान असताना आणि आता आई झाल्यावर तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे .’ याआधी तिच्या पती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ने ‘कपिल शर्मा शो’ मध्ये पिता होण्याबाबत खुलासा केला होता. त्याने सांगितलं: ‘आमचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. मी आज सकाळीच तिथून आलो आहे. तिच्या जेवणाची काळजी घ्यायची असो, झोपेचे वेळापत्रक असो, सध्या रात्री उशिरापर्यंत जागे राहतो. ३-४ वाजता तिला खाण्यासाठी उठावं लागत.’
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आई-वडिलांच्या भूमिकेत अत्यंत समर्पित दिसून येत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी ही माहिती खूप खास ठरली असून, या नवीन आयुष्याच्या टप्प्यावर त्यांचे अनुभव प्रेक्षकांसमोर आले आहेत.
हेही वाचा :
मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर
राज आणि उद्धव यांची युती झाली तर? शरद पवार स्पष्टच बोलले
शाहरुखने ‘या’ चित्रपटात कॅमेऱ्यासमोर दिलेला न्यूड सीन, इंटीमेट सीनंतर झाली होती अटक