Dashavatar सिनेमाचा सर्वत्र बोलबाला, पण (express)अभिनेत्याने सिनेमा पाहिल्यानंतर का व्यक्त केली खंत, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, ‘पाहणं तर दूर लोकांना…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दशावतार सिनेमाची चर्चा…

दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ‘दशावतार’ सिनेमात साकारलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा रंगत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका आणि (express)कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा सिनेमा फक्त बॉक्स ऑफिस नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य करत आहे. सर्वच स्तरातून सिनेमाचं कौतुक होत आहे. पण ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता तेजस महाजन याने खंत व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने सर्वांना विनंती देखील केली आहे.

व्हिडीओच्या सुरुवातील तेजस याने दिलीप प्रभावळकर यांचं कौतुक करत म्हणाला, ‘दिलीप सर, यू आर द ग्रेट, संपूर्ण टीमला सलाम आणि तुमचं मनापासून अभिनंदन… गेल्या दोन – तीन दिवसांपासून बातम्या वाचत होतो सिनेमाने पहिल्या दिवशी अमूक अमूक कलेक्शन… दुसऱ्या दिवशी अमूक अमूक कलेक्शन… म्हणून मी एक खारीचा वाटा म्हणून माझ्या ओळखीच्या लोकांना सांगत होतो की, कृपया वेळ मिळेल तेव्हा दशावतार नक्की बघून या.’

‘एका व्यक्तीला मी म्हणालो, दशावतार सिनेमा पाहून ये… तो मला म्हणाला काय आहे, कुठे लागलाय… मी त्याला म्हटलं सिनेमा आहे… खूप सुंदर आहे जाणून बघून ये… तेव्हा त्याने त्याच्या एका मित्राला फोन केला आणि ‘दशावतार’ सिनेमा पाहायला जायचं आहे असं म्हणाला… समोरची व्यक्ती म्हणाली, ‘काय आहे दशावतार…’ नवीन सिनेमा आला आहे का मराठीत…? खेदजनक खूप खूप खूप वाईट.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘एखादा दक्षिणेतला, बॉलिवूड किंवा हॉलिवूडचा सिनेमा येतो, तेव्हा सगळ्यांना उत्सुकता असते आणि जेव्हा मराठी सिनेसृष्टीत इतका सुंदर आणि बेंचमार्क ठरू शकेल अशी कलाकृती आपल्या समोर आहे आणि लोकांना माहित देखील नाही…पाहणं तर दूर, लोकांना माहित देखील नाही. म्हणून महाराष्ट्रातील तरुण मंडळींना सांगायचं आहे की, त्या Vertical चौकटीतून बाहेर या आणि 152 मिनिटाxची कलाकृती त्या Horizontal पडद्यावर बघा. एका 81 वर्षांच्या तरुण माणसाला स्क्रीनवर धुमाकुळ घालताना बघा. माझ्या नॉन महाराष्ट्रीयन मित्रांनाही माझं हेच सांगणं असेल की, तुम्हीही घराबाहेर पडा, जवळच्या चित्रपटगृहात जा आणि दशावतार नावाची जादू बघा…’ सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तेजस याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा :

 रविवारचा करा मजेदार बेत,
आज शुक्रवारी राशींवर देवी लक्ष्मीची मोठी कृपा बरसणार!
महाराष्‍ट्रासाठी Yamaha कडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा,