लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक(elections) होणार आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी हळू हळू सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदारांना खुश करण्यासाठी सरकारची तिजोरी उघडली आहे. नितीश कुमार यांनी तरुणांसाठी एक नवीन घोषणा केली आहे. त्यामुळे बिहारमधील युवकांना फायदा मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीआधी(elections) मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील युवकांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सांगितले की, ‘मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहाय्यता भत्ता योजने’अंतर्गत पदवीधर असलेल्या बेरोजगार युवकांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी दर महिन्याला 1,000 रूपये दिले जाणार आहेत.

नवम्बर 2005 में नई सरकार बनने के बाद से ही अधिक से अधिक युवाओं को सरकारी नौकरी और रोजगार देना तथा उन्हें सशक्त और सक्षम बनाना हमलोगों की प्राथमिकता रही है। आप अवगत हैं कि अगले पांच साल में एक करोड़ युवाओं को सरकारी नौकरी और रोजगार देने का लक्ष्य निर्धारित किया गया है। आने वाले…

या आधी बिहारमध्ये केवळ इंटरमिजिएट पदवी असलेल्या बेरोजगार युवकांना लाभ मिळत होता. ‘मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहाय्यता भत्ता योजनेचा विस्तार करण्यात आल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.

हेही वाचा :

आज होणार Ind vs Pak यांच्यात जबरदस्त सामना!

BSNL चे प्रीपेड प्लान्स आता अधिक स्वस्त, 15 ऑक्टोबरपर्यंत मिळणार जबरदस्त ऑफर

राज कुंद्राने घेतली नवी नावं; कोट्यवधींच्या घोटाळ्यात बिपाशा-नेहाचा उल्लेख