जगातील अ‍ॅथलेटिक्स चाहत्यांचे लक्ष गुरुवारी टोकियोच्या जपान नॅशनल स्टेडियमकडे लागणार आहे. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या जेव्हलिन थ्रोच्या फायनलमध्ये भारताचा स्टार (sports news)अ‍ॅथलीट आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा स्टार खेळाडू अरशद नदीम एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावग्रस्त वातावरणामुळे दोन्ही देशांमधील स्पोर्ट्स राइव्हलरी आणखी तीव्र झाली आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी टीमशी हस्तांदोलन टाळलं होतं, त्यानंतर आता मैदानावर नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

क्वालिफिकेशनमध्ये नीरज चोप्राने(sports news) दमदार सुरुवात केली. ग्रुप-ए मध्ये पहिल्याच थ्रोमध्ये 84.85 मीटरची कमाल करून त्यांनी फायनल गाठला. दुसरीकडे, ग्रुप-बी मध्ये अरशद नदीमची सुरुवात कमजोर झाली होती. पहिले दोन थ्रो 80 मीटरच्याही आत राहिले, पण अखेरच्या थ्रोमध्ये त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत 85.28 मीटर भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश केला.

कधी आणि कुठे पाहता येईल सामना?
जेव्हलिन थ्रो फायनल आज म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3:53 वाजता टोकियोच्या जपान नॅशनल स्टेडियममध्ये सुरू होईल. योगायोग असा की, याच स्टेडियममध्ये नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकत इतिहास रचला होता.

चाहत्यांची उत्सुकता आणि वातावरण
नीरज आणि अरशद हे आशियातील दोन मोठे जेव्हलिन थ्रोअर मानले जातात. त्यामुळे या सामन्याला केवळ क्रीडास्पर्धा म्हणूनच नाही, तर प्रतिष्ठेची लढत म्हणूनही पाहिले जात आहे. सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चेला उधाण आलं आहे. अनेकांना नीरजच्या पुनरागमनाची अपेक्षा आहे, तर पाकिस्तानमधील चाहत्यांना नदीमच्या विजयानं नवा इतिहास घडेल, अशी आशा आहे. खेळाडूंमध्ये स्पर्धात्मक भावना असली तरी मैदानावर उत्कृष्ट कामगिरीसाठी दोघांकडूनही 90 मीटर पार करण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

कोण करतंय असलं “लाल” रंगाच गलिच्छ राजकारण..?

आनंदाची बातमी! 22 सप्टेंबरपासून ‘या’ वस्तू स्वस्त होणार

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली अन्…