आशिया कप 2025 मधील पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरात (यूएई) सामन्यात बुधवारी मोठं अपघातजन्य दृश्य बघायला मिळालं. मैदानावर असलेल्या अंपायर(Umpire) रुचिरा पल्लीयागुरुगे यांना पाकिस्तानी खेळाडूने टाकलेला चेंडू थेट कानाजवळ लागला आणि क्षणभर मैदानावर तणावाचं वातावरण निर्माण झालं.ही घटना यूएईच्या डावातील सहाव्या षटकात घडली. पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद हारिसने गोलंदाज सैम अयूबकडे चेंडू वेगाने परतवला, पण तो थेट अंपायरला लागला.

लगेचच मिळाली मदत
जोरदार प्रहारामुळे पल्लीयागुरुगे काही क्षण वेदनेमुळे उभे राहू शकले नाहीत. लगेचच वैद्यकीय पथक मैदानावर धावून आलं आणि तपासणीनंतर अंपायरला मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यांची जागा बांगलादेशी रिजर्व अंपायर(Umpire) गाजी सोहेल यांनी घेतली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली, मात्र अंपायरची प्रकृती स्थिर असल्याचं समजल्यावर सुटकेचा निःश्वास टाकला.

काय लागला सामन्याचा निकाल?
सामन्याच्या निकालाबाबत बोलायचं झालं तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 146 धावा उभारल्या. फखर जमनने 36 चेंडूत अर्धशतक ठोकत संघाची बाजू मजबूत केली. अखेरच्या षटकांत शाहीन आफ्रिदीने केवळ 14 चेंडूत नाबाद 29 धावा करत डाव रंगतदार केला. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने 18 धावांत 4 बळी घेतले तर सिमरनजीत सिंगने 3 विकेट मिळवल्या.

पाकिस्तानची कामगिरी
लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईच्या फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जास्त मोकळीक दिली नाही. राहुल चोप्राने 35 धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर यूएईचा डाव 105 धावांत संपुष्टात आला आणि पाकिस्तानने 41 धावांनी विजय मिळवत सुपर-4 फेरीत प्रवेश केला.

या विजयामुळे 21 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानची थरारक लढत रंगणार आहे. लीग स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानवर सहज मात केली होती, मात्र आता सुपर-4 मध्ये हरएक बॉलवर चाहत्यांची धडधड वाढणार आहे.

हेही वाचा :

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी!

Maruti Suzuki Victoris चा बेस व्हेरिएंटची चावी हातात

तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, 21 पेक्षा जास्त जिल्ह्यांना हाय अलर्ट