भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या(Team India) जर्सीसाठी नवीन प्रायोजक शोधला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील लीड स्पॉन्सर म्हणून अपोलो टायर्सची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट टाकत याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. बीसीसीआय आणि अपोलो टायर्समधील हा करार अडीच वर्षांसाठी आहे. मार्च 2028 पर्यंत टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचे नाव राहील.

अपोलो टायर्स व्यतिरिक्त, कॅनव्हा आणि जेके सिमेंट्सनेही आशिया कपच्या लिलावात भाग घेतला. जेके सिमेंट्सने 477 कोटी रुपयांची बोली लावली, तर कॅनव्हाने 544 कोटी रुपयांची बोली लावली. तथापि, बीसीसीआयचा अपोलो टायर्ससोबतचा करार 579 कोटी रुपयांनी अंतिम झाला. यापूर्वी, बीसीसीआय आणि ड्रीम 11 ने 358 कोटी रुपयांचा तीन वर्षांचा करार केला होता. प्रत्येक सामन्यामागे अपोलो कंपनी 4.5 कोटी रुपये मोजणार आहे.
दरम्यान, अपोलो टायर्स इतर टीमसोबत जोडलेली आहे. प्रामुख्यानं फुटबॉल क्लबला ते स्पॉन्सर करतात.मँचेस्टर यूनायटेड, चेन्नेन एएफसी आणि इंडियन सुपर लीग सोबत अपोलो टायर्सचे करार आहेत. शेअर बाजारात अपोलो टायर्स कंपनीचा शेअर 487 रुपयांवर पोहोचला आहे. आज शेअर बाजारात या कंपनीचा स्टॉक 7.80 रुपयांनी वाढला आहे.
टीम इंडियाचा प्रायोजक का बदलला?
टीम इंडियाच्या(Team India) जर्सीवर पूर्वी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम 11 चे नाव होते. तथापि, भारत सरकारने ऑनलाइन गेमिंगवर एक नवीन कायदा लागू केला आहे, जो ऑनलाइन मनी गेम चालवणे आणि प्रमोट करणे दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा देण्यास पात्र आहे. म्हणूनच बीसीसीआयने ड्रीम 11 सोबतचा करार संपण्याआधीच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा :
‘भगवा पार्टीला हवाय मुस्लीममुक्त भारत…’ भाजप आसामचा Video पाहून भडकले ओवेसी
Vitamin C मुळे पोट, फुफ्फुस आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होईल कमी
महाराष्ट्र हादरला! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्याने झापल्याने शेतकऱ्याची विहिरीत उडी