नवीन वर्षात जर तुम्ही टाटा सिएरा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही (Tata Motors) महत्त्वाची माहिती आहे. टाटा मोटर्सने आपली आयकॉनिक सिएरा एसयूव्ही आधुनिक डिझाइन, अत्याधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्ससह पुन्हा एकदा भारतीय बाजारात सादर केली आहे. जुन्या सिएराची ओळख कायम ठेवत कंपनीने या नव्या मॉडेलला प्रीमियम आणि फ्युचरिस्टिक लूक दिला आहे. स्टाईल, स्पेस आणि पॉवर यांचा उत्तम समतोल साधणारी ही एसयूव्ही कुटुंबासाठीही एक मजबूत पर्याय ठरत आहे.

किंमतीबाबत बोलायचे झाले तर सिएराच्या (Tata Motors) पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन 17.99 लाख रुपयांपर्यंत जाते. टर्बो पेट्रोल मॉडेलची किंमत 17.99 लाख ते 20.99 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर डिझेल व्हेरिएंटची सुरुवात 12.99 लाख रुपयांपासून होते आणि टॉप मॉडेलची किंमत 21.29 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.
जर तुम्ही Sierra Accomplished+ 1.5 लिटर डिझेल ऑटोमॅटिक हे टॉप मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी 21.29 लाख रुपयांचे संपूर्ण कर्ज घेतले, तसेच बँकेचा व्याजदर 8.5 टक्के गृहित धरला, तर 3 वर्षांच्या कालावधीसाठी तुमचा मासिक ईएमआय अंदाजे 67 हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतो. त्याच कर्जावर 5 वर्षांचा कालावधी निवडल्यास मासिक ईएमआय सुमारे 44 हजार रुपयांच्या आसपास राहू शकतो.
मात्र ही गणना अंदाजे आहे. प्रत्यक्षात (Tata Motors) ईएमआयची रक्कम डाउन पेमेंट, ऑन-रोड किंमत, प्रोसेसिंग फी, विमा, तसेच बँकेच्या अचूक व्याजदरानुसार बदलू शकते. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपल्या बँकेशी किंवा डीलरशिपशी सविस्तर चर्चा करून अचूक हिशोब करून घेणे आवश्यक आहे.
एकंदरीत, प्रीमियम फीचर्स, आकर्षक डिझाइन आणि दमदार इंजिन पर्यायांसह नव्या टाटा सिएराने बाजारात जोरदार एंट्री केली असून, आधुनिक आणि स्टायलिश एसयूव्ही शोधणाऱ्यांसाठी हा निश्चितच एक विचार करण्यासारखा पर्याय ठरू शकतो.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?