बजाज ऑटोने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Bajaj Chetak C25 (electric scooter) नुकतीच बाजारात दाखल केली असून, लाँचनंतर लगेचच तिच्या विक्रीलाही सुरुवात झाली आहे. या लाँचिंगला अधिक खास बनवण्यासाठी कंपनीने एक मोठी आणि लक्षवेधी घोषणा केली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये ऐतिहासिक विजय मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) महिला संघातील प्रत्येक खेळाडूला बजाज चेतक C25 स्कूटर भेट देण्यात येणार आहे. संपूर्ण हंगामात बजाज चेतक हा आरसीबी महिला संघाचा अधिकृत राइड पार्टनर होता आणि या यशाच्या आनंदात बजाज ऑटोने हा खास निर्णय घेतला आहे.

Bajaj Chetak C25 हे चेतक मालिकेतील सर्वात परवडणारे मॉडेल (electric scooter) असून, ते विशेषतः शहरातील तरुण आणि रोजच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये 2.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला असून, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 113 किलोमीटरपर्यंत धावू शकते. आयडीसी सर्टिफिकेशननुसार ही रेंज देण्यात आली आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 55 किलोमीटर प्रति तास इतका आहे, जो शहरातील वापरासाठी पुरेसा मानला जातो.

चार्जिंगच्या बाबतीतही बजाज चेतक C25 (electric scooter) किफायतशीर ठरते. 750W चार्जरच्या मदतीने ही स्कूटर अवघ्या अडीच तासांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. किमतीत परवडणारी असली तरी मजबुतीच्या बाबतीत बजाजने कोणतीही तडजोड केलेली नाही. या स्कूटरची बॉडी प्लास्टिकऐवजी मेटलची बनवण्यात आली असून, बॅटरीला IP67 रेटिंग देण्यात आले आहे, त्यामुळे ती पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बजाजने अर्ली बर्ड ऑफर देखील (electric scooter) जाहीर केली आहे. पहिल्या 10 हजार ग्राहकांना 4,299 रुपयांची सूट मिळणार असून, त्यामुळे दिल्लीत या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 87,100 रुपये इतकी होईल. सध्या काही निवडक शहरांमध्येच या स्कूटरचे वितरण सुरू झाले असून, लवकरच देशभरात तिचा विस्तार करण्यात येणार आहे.

फीचर्सच्या बाबतीतही Bajaj Chetak C25 दमदार आहे. स्कूटरमध्ये इको आणि स्पोर्ट असे (electric scooter) दोन रायडिंग मोड देण्यात आले आहेत, तसेच मागे घेण्यासाठी रिव्हर्स मोडची सुविधाही उपलब्ध आहे. उतारावर स्कूटर मागे घसरू नये यासाठी हिल होल्ड असिस्ट फीचर देण्यात आले आहे. सीटखाली 25 लिटरची स्टोरेज स्पेस असून, मोबाइल चार्जिंगची सुविधाही यात मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर ब्लू, ब्लॅक, रेड आणि व्हाईटसह एकूण सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
एकूणच, किफायतशीर किंमत, दमदार फीचर्स आणि ब्रँडची विश्वासार्हता यामुळे Bajaj Chetak C25 शहरातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये मजबूत पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी