एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी (Mahindra) महत्त्वाची आहे. देशातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये वाढती मागणी पाहता Mahindra & Mahindra ने 2026 ची सुरुवात दमदार केली आहे. जानेवारी 2026 मध्ये कंपनीने एकूण 63,510 वाहनांची विक्री नोंदवली असून गेल्या वर्षीच्या जानेवारीतील 50,659 युनिट्सच्या तुलनेत तब्बल 25.37 टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर 2025 च्या तुलनेतही विक्रीत 24.66 टक्क्यांची वाढ झाली असून एसयूव्हींची वाढती लोकप्रियता स्पष्ट दिसत आहे.

कंपनीच्या विक्रीत Mahindra Scorpio ने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. (Mahindra) जानेवारी 2026 मध्ये स्कॉर्पिओच्या 15,542 युनिट्सची विक्री झाली. वार्षिक वाढ केवळ 0.65 टक्के असली तरी शहर आणि ग्रामीण भागात या मॉडेलची मागणी स्थिर आणि मजबूत आहे. दरम्यान, Mahindra Thar ने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. 13,418 युनिट्स विक्रीसह थारने वर्षागणिक 77.56 टक्के वाढ मिळवली, तर डिसेंबरच्या तुलनेत 43.68 टक्क्यांची उसळी घेतली. नवीन व्हेरिएंट्स आणि थार रॉक्समुळे ग्राहकांमध्ये या एसयूव्हीची क्रेझ वाढली आहे.
ग्रामीण बाजारपेठेत अजूनही Mahindra Bolero चे वर्चस्व कायम (Mahindra) असून जानेवारीत 11,841 युनिट्सची विक्री झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 36.39 टक्के अधिक आहे. त्याचवेळी Mahindra XUV700 आणि Mahindra XUV 3XO सारख्या मॉडेल्सनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. XUV 3XO ने 10,133 युनिट्सची विक्री नोंदवत 20.65 टक्के वाढ साधली, तर ईव्ही सेगमेंटमध्ये 8,845 युनिट्सची विक्री झाली.
महिंद्राची इलेक्ट्रिक वाहनेही (Mahindra) आता हळूहळू बाजारात मजबूत स्थान निर्माण करत आहेत. Mahindra XEV 9e च्या 1,945 युनिट्सची विक्री झाली असून 71.06 टक्के वाढ नोंदली गेली. Mahindra BE 6 ने 1,028 युनिट्स विकत 46.86 टक्के वाढ दर्शवली. नुकत्याच लाँच झालेल्या Mahindra XEV 9S ला देखील 612 ग्राहकांनी पसंती दिली. मात्र Mahindra XUV400 ची विक्री 49.31 टक्क्यांनी घसरून 146 युनिट्सवर आली आहे, कारण ग्राहक नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्सकडे अधिक आकर्षित होत आहेत.
एकंदरीत, थार, बोलेरो आणि नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हींच्या वाढत्या मागणीमुळे महिंद्राने एसयूव्ही बाजारात आपली पकड आणखी मजबूत केली आहे. 2026 मध्येही कंपनीची ही विक्रीची घोडदौड कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?