सोन्ं-चांदीच्या(Gold) दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहेत. भारतीय बाजारात सोन्याच्या दराने सारे उच्चांक मोडले आहेत. तर चांदीच्या दरातही किंचितशी वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याचा वायदा 1,09,245 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. मागील व्यवहारात भाव 1,09,370 रुपये इतका होता. मागील आठवड्यात सोन्याचे दर वाढले होते. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात किंचितशी घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत सोमवारी किंचितशी नरमली आहे. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्याने घटून $3.633.86 प्रति औंसवर पोहोचली आहे. तर डिसेंबरचा वायदा अमेरिकी गोल्ड फ्युचर्स 0.4 टक्क्याने $ 3.671.30 वर व्यवहार करत आहे. डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीकरणामुळं सोन्याच्या दरात आज किंचितशी घट झाली आहे. गुंतवणुकदारांची नजर या आठवड्यात होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बैठकीवर आहे. यामुळंही सोन्याच्या किंमतीत घसरू शकतात.
आज सोन्याच्या(Gold) दरात 110 रुपयांची घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 1,11,060 रुपये प्रतितोळावर स्थिरावले आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली असून 1,01,800 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांनी घसरले असून 83,290रुपयांवर पोहोचले आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,01,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,11,060 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 83,290 रुपये
ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 10,186 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 11,106 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 8,329 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 81, 440 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 88, 848 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 66, 632 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,01,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,11,060 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 83,290 रुपये
हेही वाचा :
कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट…
महाराष्ट्र देशी जात कलह वाढो ही इथल्या राजकारण्यांची इच्छा
‘दिवसाढवळ्या तो प्रायव्हेट पार्ट …’ सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीने आता केला खुलासा