90च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या प्रेमकथांपैकी एक होती ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता(actor) सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी. त्या काळात त्यांच्या नात्याच्या बातम्या सतत गॉसिप कॉलममध्ये झळकत होत्या. अशातच आता या दोघांच्या नात्याविषयी अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी काही न ऐकलेले दोघांबद्दलचे किस्से उघड केले आहेत.

रेड एफएमच्या पॉडकास्टदरम्यान हिमानी शिवपुरी म्हणाल्या की, ‘मी ऐश्वर्या रायला पहिल्यांदा ‘आ अब लौट चलें’च्या सेटवर भेटले. त्यावेळी ती इंडस्ट्रीत नवी होती आणि आम्ही पटकन जवळच्या मैत्रिणी झालो. त्यानंतर आम्ही ‘आ अब लौट चलें’, ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘उमराव जान’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
हिमानी यांनी या पॉडकास्टमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये हैदराबादच्या शूटदरम्यान सलमान खान नेहमी ऐश्वर्या रायला भेटायला यायचा. तो रात्री सेटवर यायचा आणि सकाळी परत जायचा. त्या काळात सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे त्याची ये-जा नेहमीच व्हायची’.
त्या पुढे म्हणाल्या की, ‘सलमान खानला अनेकदा छोट्या गोष्टींवरून चटकन राग यायचा. अशावेळी मला मध्यस्थाची भूमिका निभवावी लागायची. एकदा चित्रपट सिटीमध्ये शूटिंग सुरू असताना ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत एका चित्रपटाचे शूट करत होती. त्यावेळी सलमान खान आला आणि मला म्हणाला ‘याला समजाव. वहिदा रहमानकडे बघ. स्वतःला खूप सुंदर समजते ही. मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाले ‘शांत हो, गप्प बस.’

‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटादरम्यान सलमान खान (actor)आणि ऐश्वर्या राय यांची जवळीक खूप वाढली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले होते. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री सर्वत्र चर्चेत आली होती. मात्र, हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. अखेरीस ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनशी विवाह केला.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळीक वाढल्याने सुरू झाले. या चित्रपटातील त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफ-स्क्रीन जवळीक यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते.हिमानी शिवपुरी यांनी रेड एफएमच्या पॉडकास्टदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल काही न ऐकलेले किस्से सांगितले. त्यांनी हैदराबादमधील शूटिंगदरम्यान सलमानच्या सेटवरील भेटी आणि त्याच्या स्वभावाबद्दल उल्लेख केला.
हिमानी यांनी सांगितले की, त्या ऐश्वर्या रायला पहिल्यांदा ‘आ अब लौट चलें’च्या सेटवर भेटल्या आणि त्या जवळच्या मैत्रिणी झाल्या. हैदराबादच्या शूटिंगदरम्यान सलमान रात्री ऐश्वर्याला भेटायला यायचा आणि सकाळी परत जायचा. त्या म्हणाल्या की, सलमानला लहान गोष्टींवर राग यायचा, आणि त्यावेळी त्या मध्यस्थाची भूमिका निभवायच्या.
हेही वाचा :
ट्रॅफिकने घेतला चिमुकल्याचा जीव! 5 तास Ambulance एकाच जागी
दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सव्वालाखांची छप्परफाड पगारवाढ
रूममेटशी भांडण अन् पोलीसांनी धाडधाड 4 गोळ्या झाडल्या, इंजिनियरची हत्या