दिवाळीचे दिवस जवळ आले की, नोकरदार (employees)वर्गाला वेध लागतात ते म्हणजे पगारवाढीचे. वर्षभर काम केल्यानंतर दिवाळी बोनस म्हणून हाती येणारी रक्कम प्रत्येकालाच सुखावणारी वाटते. ही रक्कम किती असेल, काही शे… हजार किंवा पद आणि व्यक्तीचं काम यांना अनुसरून दिलं जाणारं (पैशांच्या स्वरुपातील) बक्षीस. पण, हाच बोनस किंवा एका अर्थी बगारवाढ जर लाखोंमध्ये असेल तर? आश्चर्यचकित झालात ना?

प्रत्यक्षात बोनस आणि पगारवाढ या दोन्ही वेगळ्या संकल्पना असल्या तरीही एका कंपनीनं दिवाळी या जागतिक स्तरावर साजरा केल्या साणाऱ्या सणापूर्वी झालेल्या पगारवाढीला ‘छप्परफाड बोनस’ म्हणणं वावगं ठरणार नाहीये. राहिला प्रश्न ही लाखोंची पगारवाढ दिली कोणी याबाबतचा? तर, ही पगारवाढ दिली आहे जगातील सर्वात नामांकित अशा ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉननं.

अ‍ॅमेझॉननं फेस्टीवल सिझनदरम्यानच कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली असून, कंपनीतील वेअरहाऊस आणि डिलीव्हरी या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला. या पगारवाढीसाठी कंपनीनं 1 बिलियन डॉलर (100 कोटी रुपये) इतकी मोठी गुंतवणूक केली. या निर्णयानंतर पूर्णवेळ कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कमाईत सरासरी 1600 डॉलरची वाढ झाली. सोबतच अ‍ॅमेझॉननं हेल्थकेअर खर्च कमी करण्यापासून मोफत शिक्षण आणि इतर सुविधांवरही भर दिला.

फेस्टीव्ह सिझनमध्ये अ‍ॅमेझॉननं कर्मचाऱ्यांसाठी(employees) एक मोठी गुंतवणूक करत पगार आणि इतर सुविधा वाढवण्यावर भर दिला. या पगारवाढीच्या नव्या निकषांनंतर अ‍ॅमेझॉनच्या फुलफिलमेंट आणि ट्रान्सपोर्टेशन स्टाफच्या पगारात प्रतितास 23 डॉलर म्हणजे 1900 रुपयांहून अधिक वाढ होणार आहे. तर, इतर फायदे जोडल्यास 30 डॉलर प्रतितास अर्थात ही वाढ 2500 रुपयांपेक्षाही अधिक असेल. पूर्णवेय़ळ कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला 1600 डॉलर म्हणजेच साधारण 1.3 लाख रुपये, काहींना 1.10 लाख तर काहींना 1.90 लाख रुपये इतकी पगारवाढ मिळणार आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांच्या पगारवाढ धोरणाअंतर्गतच ही वाढ करम्यात आली आहे. कंपनीच्या निकषांनुसार जे कर्मचारी तीन वर्षांहून अधिक काळापासून कंपनीसाठी काम करत आहेत त्यांच्या पगारात आतापर्यंत 35 टक्के वाढ झाली आहे.100 टक्के शैक्षणिक खर्चाचा निर्णय घेत अ‍ॅमेझॉननं 475 शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करत कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती ठेव योजनासुद्धा सुरू केली आहे.

‘फ्लेक्सिबल टाइम ऑफ, पेड पेरेंटल लीव आणि 24/7 मेंटल हेल्थ सपोर्ट’ अशा सुविधाही कंपनीकडून दिल्या जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या गरजा सातत्यानं लक्षात घेत त्या अनुषंगानं कंपनीकडून पावलं उचलली जात असून, जिथं कर्मचाऱ्यांना एखाद्या यंत्राची वागणूक दिली जाते अशा कैक कंपन्यांना Amazon आरसा दाखवत आहे हे खरं.

अ‍ॅमेझॉनने फेस्टीव्हल सिझनदरम्यान वेअरहाऊस आणि डिलीव्हरी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ जाहीर केली आहे. यासाठी कंपनीने 1 बिलियन डॉलर (100 कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे.या पगारवाढीचा फायदा अ‍ॅमेझॉनच्या फुलफिलमेंट आणि ट्रान्सपोर्टेशन स्टाफला होणार आहे, ज्यामध्ये पूर्णवेळ आणि अंशकालीन कर्मचारी समाविष्ट आहेत.तीन वर्षांहून अधिक काळ कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आतापर्यंत 35 टक्के वाढ झाली आहे, आणि त्यांना या नवीन पगारवाढीचा विशेष लाभ मिळेल.

हेही वाचा :

काजोलने पुन्हा मोडला ‘तो’ नियम; ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ चर्चेत
4 सख्ख्या बहिणींवर बलात्कार; हादरवणारा घटनाक्रम समोर
6 खेळाडू गायब; team India मध्ये मोठ्या बदलाचे संकेत