माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहिल्यानगरमध्ये घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील चार तरुणींवर बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चारही पीडित मुली सख्ख्या बहिणी (sisters)आहेत. या प्रकरणाची वाचा फोडण्याआधीही या चौघींपैकी सज्ञान झालेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडील विभक्त झाल्याने दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळ करण्यासाठी दिलेल्या एकाच कुटुंबातील 4 सख्ख्या बहि‍णींवर पालनकर्त्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकरणामध्ये पती आणि पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. आज आरोपींना न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती राहुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे. सेवाभावी संस्था असलेल्या ‘स्नेहालय’च्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ‘उडान’ प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे.

कार्यकर्त्यांनी सदर प्रकरणाकडे राहुरी पोलिसांचं लक्ष वेधल्यानंतर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तातडीने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत कारवाई केली. पोलिसांनी तातडीने हालचाल करत चौघींची सुटका करत आरोपी दांपत्याला अटक केली.पीडित मुली एकाच कुटुंबातील असून मूळच्या नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी एक मुलगी सज्ञान असून अन्य तिघी अल्पवयीन आहेत. सज्ञान मुलीचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र लग्नापूर्वी ही तरुणी बहि‍णींना (sisters)भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आली होती. चार दिवसांपूर्वी राहुरीला आलेल्या या तरुणीवर अत्याचार करण्यात आला.

मात्र यावेळेस तिने तिच्यासोबत आणि तिच्या बहिणींसोबत घडत असलेला प्रकार पतीला सांगितला. नंतर चर्चा करुन दोघांनाही ‘स्नेहालय’ संस्थेच्या उडान प्रकल्पातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून प्रकरणाला वाचा फोडली. यानंतर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आणि आरोपी दांपत्याला बेड्या घालण्यात आल्या.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांमधील अल्पवयीन मुलींपैकी एकजण 16, दुसरी 14 तर तिसरी 10 वर्षांची आहे. या मुलींचं आता समोपदेशन केलं जाणार असून त्यांना हवी ती मदत ‘स्नेहालय’ संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील दवणगाव परिसरात एकाच कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींवर त्यांच्या दूरच्या नातेवाईक दांपत्याने (पालक म्हणून सांभाळ करणाऱ्या पती-पत्नीने) लैंगिक अत्याचार केला आहे. आई-वडील विभक्त झाल्याने मुलींना सांभाळण्यासाठी नातेवाईकांकडे देण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची वाचा फोडण्यापूर्वीच सज्ञान असलेल्या मोठ्या बहिणीवरही अत्याचार झाल्याचा खुलासा समोर आला आहे.

चार महिन्यांपूर्वी सज्ञान असलेल्या मोठ्या बहिणीचा विवाह झाला होता. ती बहिणींना भेटण्यासाठी चार दिवसांपूर्वी राहुरीला आली असता तिच्यावर अत्याचार झाला. तिने हे पतीला सांगितले आणि दोघांनी ‘स्नेहालय’ संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणात पती आणि पत्नीला (आरोपी दांपत्य) राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा :

6 खेळाडू गायब; team India मध्ये मोठ्या बदलाचे संकेत
जीभ वळवळते, भाषा कळवळते……
आयफोन 17 साठी नागरिकांमध्ये मारामारी, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल