बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री(actress) शबाना आझमी यांनी 18 सप्टेंबरला आपला 75वा वाढदिवस साजरा केला. या खास निमित्ताने आयोजित पार्टीत बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींची हजेरी आणि ग्लॅमरने सोशल मीडियावर धमाल केली.पार्टीतली एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात शबाना आझमी, रेखा, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, विद्या बालन यांनी ‘कैसी पहेली जिंदगानी’ गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. चाहत्यांनी या डान्सवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे आणि अभिनेत्रींच्या एनर्जीचे कौतुक केले आहे.

70 वर्षांच्या रेखा यांनी पार्टीत काळा ड्रेस, पांढऱ्या रंगाचे स्टायलिश जॅकेट, डोक्यावर कॅप आणि सनग्लासेस घालून चारचाँद लावले. फॅशन आणि डान्समध्ये त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

इतर अभिनेत्रींचा ग्लॅमर

माधुरी दीक्षित – लाल रंगाचा को-ऑर्ड सेट

उर्मिला मातोंडकर – सोनेरी आणि काळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट

विद्या बालन – राखाडी रंगाचा पोशाख

शबाना आझमी – काळा आणि लाल रंगाचा ड्रेस

या पार्टीतील डान्स आणि फॅशन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी अभिनेत्रींच्या (actress)स्टाइल आणि एनर्जीचे कौतुक करत अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. शबाना आझमीच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडने एकदा पुन्हा ग्लॅमर आणि उत्साहाचा जलवा साजरा केला आहे.

हेही वाचा :

निर्वस्त्र हायवेवर फेकून दिलं, डॉक्टरचं विकृत कृत्य 
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता H-1B Visa धारकांना दणका!
‘वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा’; अजित पवार कोणावर कडाडले?