जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराजस्व अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवड्यात पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आता रेशन(ration card) दुकानांमध्ये चार प्रकारचे क्यूआर कोड लावले जाणार आहेत, ज्यामुळे ग्राहकांना घरबसल्या विविध सेवा मिळणार आहेत तसेच शासनापर्यंत थेट अभिप्राय पोहोचणार आहे.

कुठल्या सुविधा मिळणार?
1️⃣ शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली
नवीन शिधापत्रिका काढणे
नाव वाढविणे किंवा कमी करणे
घरबसल्या अर्ज करण्याची सोय
2️⃣ धान्य वितरण माहिती
हक्काचे धान्य मिळते का ते तपासता येणार
वितरणाची तारीख, प्रमाण, पात्रता याची माहिती
दुकानातून झालेल्या वितरणाचा तपशील
3️⃣ रेशन दुकानाला रेटिंग प्रणाली
वागणूक कशी मिळाली?
काटामारी, जादा पैसे घेतले का?
तक्रारीवर वरिष्ठांनी केलेली कारवाई पाहता येणार
4️⃣ कार्यालय सेवा अभिप्राय फॉर्म
ग्राहकांना सेवा सुधारण्यासाठी अभिप्राय देता येणार
शासनाला थेट अनुभव आणि सूचना मिळणार
🔸 पुरवठा विभागाचे प्रयत्न
जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

🔸 शिधापत्रिका कामांना प्राधान्य
सेवा पंधरवड्यात शिधापत्रिकांशी (ration card)संबंधित कामांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
कुटुंबातील सदस्य विभक्त झाल्यास स्वतंत्र शिधापत्रिका
विवाह, स्थलांतर आदी कारणांनी नाव वगळणे
नव्या सदस्यांचा समावेश करणे
या नव्या उपक्रमामुळे ग्राहकांना पारदर्शक व सन्मानपूर्वक सेवा मिळणार असून शासनालाही थेट लोकांच्या अनुभवाची माहिती मिळणार आहे.
हेही वाचा :
निर्वस्त्र हायवेवर फेकून दिलं, डॉक्टरचं विकृत कृत्य
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता H-1B Visa धारकांना दणका!
‘वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा’; अजित पवार कोणावर कडाडले?