सेलमध्ये आयफोन खरेदी केला? पण कंपनीने तुम्हाला(sale) चुना तर लावला नाही ना? सेलमधून खरेदी केलेला आयफोन असली आहे की नकली, कसं ओळखालं? घाबरू नका, काही सोप्या टिप्स तुमची समस्या सोडवणार आहेत.

ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव सीजन सुरु झाला आहे.(sale) ग्राहकांना कमी किंमतीत आयफोन खरेदी करण्याची संधी आहे. कारण या सेलमध्ये आयफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे जे लोकं अँड्रॉईडवरून आयफोनवर स्विच करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सारख्या सेलमध्ये आयफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह आयफोन खरेदी करण्यावर लोकं भर देत आहेत. सेलमध्ये इतर स्मार्टफोनपेक्षा आयफोनची मागणी जास्त आहे.

सोशल मीडियावर तक्रारींचा पूर
ज्याप्रमाणे आयफोनची मागणी वाढत आहे, त्याचप्रमाणे तक्रारींमध्ये देखील वाढ होत आहे. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival सारख्या सेलमधून अनेकांनी आयफोन ऑर्डर केला. मात्र यानंतर सोशल मीडियावर तक्रारींचा पूर आला. अनेक यूजर्सनी सोशल मीडियावर असा दावा केला आहे की, त्यांनी सेलमध्ये जो मॉडेल ऑर्डर केला होता आणि जो स्टोरेज व्हेरिअंट ऑर्डर केला होता, तो त्यांना मिळाला नाही.
खरे आणि बनावट आयफोनमध्ये फरक कसा करावा?
अशा देखील काही घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये इनवॉइस आणि बॉक्सवर लिहीलेला IMEI नंबर देखील फोनसोबत जुळत नव्हता. अशा अनुभवांमुळे ग्राहकांना खरे आणि बनावट आयफोनमध्ये फरक कसा करावा, हे समजत नाही. सेलमध्ये नकली आणि सेकंड हँड आयफोनची विक्री होण्याची शक्यता अधिक असते. कारण यापूर्वी देखील अनेक युजर्सनी अशा तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आपण खरेदी केलेला आयफोन खरा आहे की बनावट हे ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.
नक्की गडबड काय झाली?
अलीकडेच एका युजरने सांगितलं की, iPhone 16 चा 256GB व्हेरिअंट ऑर्डर केला होता. मात्र डिलीव्हरीवेळी त्याला बॉक्समध्ये 128GB मॉडेल मिळाला. जेव्हा त्याने फोन सेट केला तेव्हा त्याला बिलावरील IMEI नंबर डिव्हाइसवरील IMEI नंबरपेक्षा वेगळा असल्याचं आढळलं. ही गडबड डिलिव्हरीमध्ये मोठी त्रुटी किंवा फसवणूक असल्याचं सांगते. कंपनीने नंतर रिफंड देऊन ही समस्या सोडवली असली तरी, या अनुभवामुळे इतर ग्राहक सतर्कता झाले आहेत.
Apple वेबसाइटवर सीरियल नंबर व्हेरिफाय करा.
Apple Check Coverage वर जाऊन मूळ आयफोनचे वॉरंटी आणि एक्टिवेशन डिटेल्स पाहता येतील.
पुरावा ठेवा – पावतीचा व्हिडिओ किंवा फोटो घ्या. कोणत्याही समस्या असल्यास हा पुरावा उपयुक्त ठरेल.
सावधानी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे
फेस्टिव सीजनदरम्यान लाखो ऑर्डर डिलीव्हर केल्या जातात. अशा परिस्थितीत चुकीचे मॉडेल, स्टोरेज मिस्टेक आणि कधी-कधी खोटे प्रोडक्ट डिलीव्हर केले जाण्याची शक्यता आहे. iPhone सारख्या महागड्या डिव्हाईसची छोटीशी चूक देखील मोठे नुकसान करू शकते. म्हणूनच ग्राहकांना प्रत्येक वेळी ओपन-बॉक्स तपासणी करण्याचा आणि संपूर्ण तपासणीशिवाय पावतीची पुष्टी करू नका असा सल्ला दिला जातो.
हेही वाचा :
20 वर्षीय तरुणाची कारखान्यात घुसून हत्या….
विकी – कतरिनाच्या गोड बातमीवर अक्षयची कमेंट…
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत; अजित पवार….