भारतीय टी20 संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आशिया कप 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या मॅचविनिंग अर्धशतकानंतर(half-century) त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांनाही धो-धो फटकेबाजी करत चिरडून टाकले. मात्र या वेळी त्याच्या फिफ्टीनंतर झालेला सेलिब्रेशन खास ठरला आणि त्याने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यावर नेटिझन्स काही प्रश्न विचारत आहेत.

अभिषेकने सुपर-4 सामन्यात अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक(half-century) झळकावत बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो केले. त्याने 6 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी करत एकूण 75 धावा केल्या. या कामगिरीदरम्यान त्याने युवराज सिंगचा विक्रम मोडत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत पाचव्यांदा 50+ धावा करण्याचा पराक्रम केला. या यादीत आता तो सूर्यकुमार यादव (7) आणि रोहित शर्मा (6) यांच्या मागोमाग तिसऱ्या स्थानावर आहे. शेवटी तो रनआउट झाला, पण त्याची खेळी भारतासाठी निर्णायक ठरली.

फिफ्टी पूर्ण होताच अभिषेकने स्टेडियमकडे पाहत बल्ला उंचावला आणि प्रेक्षकांकडे ‘फ्लाइंग किस’ पाठवली. चाहत्यांमध्ये लगेच चर्चा रंगली की हा किस नेमका कोणासाठी? उत्तरही लगेच स्पष्ट झाले. स्टँडमध्ये त्याची बहिण कोमल शर्मा उपस्थित होती आणि त्या क्षणी तिनेही भावाच्या यशावर आनंद व्यक्त करत त्याच अंदाजात प्रतिसाद दिला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही कोमल मैदानात हजर होती आणि अभिषेकच्या दमदार खेळीवर तिने अभिमान व्यक्त केला होता.

अभिषेकच्या विस्फोटक फलंदाजीमुळे भारताने 20 षटकांत 168 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात बांगलादेशाचा डाव 127 धावांवर संपुष्टात आला. भारताने सामना 41 धावांनी जिंकत आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गोलंदाजीत कुलदीप यादवने तीन बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांना एक-एक यश मिळाले.

हेही वाचा :

जया बच्चन यांनी अभिनेत्याला बेदम मारलं तेव्हा… 
ज्येष्ठ नागरिकांना FD साठी कोणत्या बँका सर्वोत्तम?
नवरात्री स्पेशल: उपवासाचे बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ,