शारदीय नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास करण्याचे (Navratri)विशेष महत्त्व आहे. तर यादिवसांमध्ये शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दुध, फळं व सुक्यामेव्यापासून उपवासाचे पदार्थ कसे बनवायचे ते जाणून घेऊयात…

शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात झालेली आहे. तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीची आराधना व उपासना करण्याचे हे उत्तम दिवस मानले जातात. तर या दिवसांमध्ये (Navratri)अनेकजण नऊ दिवस उपवास करतात. पण अनेकदा उपवासात लोकांना थकवा जाणवतो, याचे मुख्य कारण योग्य पोषणाचा अभाव असणे. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दूध, फळे आणि सुकामेवा यांच्या साहाय्याने हे पाच पौष्टिक स्नॅक्स बनवून सेवन करू शकतात. केळी-नारळाच्या मिल्कशेकपासून ते बदाम केशर बर्फीपर्यंत हे पदार्थ तुम्हाला उत्तम चव आणि मुबलक पोषण दोन्ही देतील.

बऱ्याचदा लोक उपवास करताना फक्त बटाटे आणि साबुदान्यापासुन बनवलेले पदार्थ सेवन करत असतात. ज्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही. जर तुम्हाला या वेळी निरोगी पद्धतीने उपवास करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात दूध, फळे आणि सुक्यामेव्यापासून बनवलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. हे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवतीलच, शिवाय तुमच्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील प्रदान करतील. चला जाणून घेऊयात.

बदाम-केशर बर्फी

जर तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल तर बदाम-केशर बर्फी उपवासामध्ये खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. बदाम केशर बर्फी बनवायला सोपी आहे आणि त्वरित ऊर्जा देते. बदामांमध्ये प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट असतात, जे तुम्हाला जास्त काळ पोट भरण्यास मदत करतात. केशर केवळ चव आणि सुगंध वाढवत नाही तर त्याचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. घरी ही बर्फी बनवल्याने उपवासाच्या वेळी तुमची गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते.

केळी-नारळ मिल्कशेक

केळं आणि नारळापासून बनवलेलं शेक तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही ठेवेल. केळी हे उर्जेचा एक उत्तम स्रोत आहे, कारण त्यात नैसर्गिक साखर आणि पोटॅशियम भरपूर असते. दुसरीकडे, नारळाचे दूध किंवा पाणी तुम्हाला हायड्रेटेड ठेवते आणि त्यातील हेल्दी फॅट दीर्घकाळ ऊर्जा टिकून ठेवते. उपवासाच्या वेळी नाश्त्यासाठी हा शेक एक परिपूर्ण पर्याय आहे.

रताळे आणि डाळिंब चाट

रताळे आणि डाळिंब यापासून बनवलेला उपवासाचा चाट केवळ चविष्टच नाही तर फायबर आणि जीवनसत्त्वांनीही परिपूर्ण आहे. गोड रताळ्यांमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, जे हळूहळू ऊर्जा प्रदान करत असतात आणि तुम्हाचे पोट दिवसभर भरलेले राहते. तर यामधील डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराला विषमुक्त करण्यास मदत करतात. कोथिंबीरची पाने आणि लिंबाचा रस टाकून तुम्ही हा चाट आणखी मसालेदार बनवू शकता.

दुधी भोपळा आणि दुधाची रबडी

दुधी भोपळ्यापासून बनवलेली रबडी विशेषतः उपवासाच्या वेळी बनवली जाते. दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते पोट हलके ठेवते आणि शरीर हायड्रेटेड राहते. दुधात दुधी मिक्स करून बनवलेली ही रबडी केवळ चविष्ट नाही तर पोटातील जडपणा कमी करण्यास देखील मदत करते.

हेही वाचा :

घराच्या ‘या’ दिशेला ठेवा या काही गोष्टी,
सर्दीमुळे नाक बंद झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय, 
GST कमी झाला आणि ‘या’ कारची किंमत एका झटक्यात 1.20 लाख रुपयांनी उतरली,