आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अळशीच्या बियांची(recipe) चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.

शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडते आणि वजन कमी होण्याऐवजी (recipe)आणखीनच वाढत जाते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स, गोळ्या औषध आणि डाएट फॉलो केला जातो. पण त्याऐवजी नियमित आहारात जवसाच्या चटणीचे सेवन केल्यास महिनाभरात वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. महिलांच्या आरोग्यासाठी आळशी अतिशय प्रभावी ठरतात. जवस खाल्यामुळे वजन कमी होण्यासोबत संपूर्ण शरीराला फायदे होतात. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ही चटणी शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. अनेक लोक जवसाच्या बियांचे सेवन सॅलड, दही किंवा स्मूदीमध्ये सुद्धा टाकून खातात. चला तर जाणून घेऊया जवस चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
अळशीच्या बिया
लसूण
लाल मिरच्या
जिरं
मीठ
हिरवी मिरची
जिरं
हळद
कोथिंबीर
तेल
कृती:
चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तव्यावर अळशीच्या बिया हलक्याशा भाजून घ्या. त्यानंतर बिया ताटात काढून घ्या.
तव्यावर तेल गरम करून त्यात जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि सुक्या लाल मिरच्या टाकून हलक्याशा भाजून घ्या.
त्यानंतर त्यात टोमॅटोचे तुकडे टाकून ५ ते ६ मिनिटं भाजून घ्या. नंतर त्यात हळद टाकून मिक्स करा.
मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले सर्व पदार्थ टाकून भाजलेल्या अळशीच्या बिया, मसाले, मीठ आणि लिंबाचा रस घालून बारीक पेस्ट वाटून घ्या.
वाटून घेतलेली चटणी वाटीमध्ये काढून सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली अळशीच्या बियांची चटणी.
हेही वाचा :
किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…!
आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस राशींसाठी भाग्यशाली; अचानक होणार धनलाभ, आजचे राशीभविष्य