कारल्याची भाजी कोणालाच खायला आवडत नाही. (karli)अशावेळी तुम्ही कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

कारल्याच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर सगळेच नाक मुरडतात. चवीला कडू असलेली कारली खायला कोणालाच आवडत नाही. पण कारलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये(karli) असलेले घटक शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कडू चवीची पौष्टिक भाजी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भात डाळीसोबत अतिशय सुंदर लागेल. घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी भाजी काय बनवावीस सुचत नाही. अशावेळी कारली फ्राय बनवू शकता. लहान मुलांना कारली खायला आवडत नाही, पण या पद्धतीने बनवलेली कारली फ्राय लहान मुलं आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
कारली
मीठ
लाल तिखट
हळद
धणे पावडर
लिंबाचा रस
रवा
तांदळाचे पीठ
तेल
कृती:
कुरकुरीत कारली फ्राय बनवण्यासाठी पांढऱ्या रंगाची कारली घ्यावी. कारली स्वच्छ धुवून आतील बिया काढून घ्या आणि बारीक उभ्या आकारात कारली चिरून घ्या.
त्यानंतर कापून घेतलेल्या कारल्यानां मीठ लावून १५ ते २० मिनिटं तसेच ठेवून घ्या.
त्यानंतर त्यातील पाणी काढून कारली हाताने दाबून घ्या. यामुळे कडवटपणा कमी होईल.
मोठ्या भांड्यात कारली घेऊन त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, जिऱ्याची पावडर, धणे पावडर, लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
ताटात रवा, तांदळाचे पीठ आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा. तव्यावर तेल गरम करण्यासाठी ठेवा.
मसाला लावलेली कारली रव्यात घोळवून तव्यावरील गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्य बनवलेली कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय.
हेही वाचा :
काय सांगतं शास्त्र ?
‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश,
आजचा बुधवार राशींसाठी भाग्याचा! विठुरायाच्या कृपेने संकेट टळेल, धनलाभाचे योग, राशींचे राशीभविष्य