सकाळच्या नाश्त्यात कायमच ब्रेड खाऊन कंटाळा आल्यानंतर(pakoda) काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड पकोडा बनवू शकता. जाणून घ्या ब्रेड पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी.

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी ब्रेड बटर किंवा बिस्कीट इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच ब्रेड खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि (pakoda) टेस्टी पदार्थ खायला सगळ्यांचं हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा किंवा ब्रेड बटर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक ब्रेड पकोडा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाताना बनवून नेण्यासाठी अतिशय उत्तम आहे. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करूनच कामासाठी बाहेर जावे. कारण उपाशी पोटी दीर्घकाळ राहिल्यामुळे चक्कर किंवा अशक्तपणा येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळी पोटभर नाश्ता करावा, ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया ब्रेड पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

ब्रेड
कांदा
गाजर
भोपळा
हिरवी मिरची
कोथिंबीर
सातूचे पीठ
पांढरे तीळ
चीज
हळद
गरम मसाला
बेसन

कृती:

पौष्टिक ब्रेड पकोडा बनवण्यासाठी, सर्वप्रथम भांड्यात किसलेला गाजर, दुधी भोपळा, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.

त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, सातूचे पीठ, बेसन, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करून घ्या.

तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे, जास्त पाणी घातल्यामुळे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते.

भाज्यांचे तयार केलेले मिश्रण ब्रेडच्या दोन्ही बाजूने लावून त्यात किसलेले चीज टाकून फोल्ड करून घ्या.

कढईमधील गरम तेलात तयार केलेला पकोडा टाकून दोन्ही बाजूने तळून घ्या. पकोडा कायमच मंद आचेवर टाळावा.

तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पौष्टिक ब्रेड पकोडा. हा पदार्थ पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत अतिशय सुंदर लागेल.

हेही वाचा :

काय सांगतं शास्त्र ?
‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश, 
आजचा बुधवार राशींसाठी भाग्याचा! विठुरायाच्या कृपेने संकेट टळेल, धनलाभाचे योग, राशींचे राशीभविष्य