दिवाळीचा फराळ हा आपल्या सणाचा गोड-तिखट संगम (corn)असतो आणि मक्याचा चिवडा त्यात नक्कीच खास स्थान मिळवतो. हलका, स्वादिष्ट आणि कुरकुरीत, एकदम परफेक्ट दिवाळी स्नॅक!

“दिवाळी म्हटलं की आपल्या घरात गोड आणि तिखट पदार्थांची रेलचेल असते. चकली, करंज्या, लाडू, शंकरपाळे या पारंपरिक पदार्थांसोबत काही हलकेफुलके आणि कुरकुरीत स्नॅक्सही (corn)दिवाळीला हवेतच! त्यातला एक खास आणि पौष्टिक पर्याय म्हणजे चिवडा. दिवाळी फराळात चिवडा आवर्जून बनवला जातो मात्र आज आम्ही तुम्हाला मक्याच्या चिवड्याची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत. हलक्या फुलक्या भुकेला शमवण्यासाठी हा एक चविष्ट पर्याय आहे. दिवाळीच्या फराळात तुम्ही या चिवड्याचा समावेश करू शकता.
हा चिवडा हलका, कमी तेलकट आणि लांब दिवस टिकणारा असल्यामुळे दिवाळीच्या फराळात उत्तम भर घालतो. मक्याचे दाणे कुरकुरीत भाजून, त्यात मसाले, शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकल्यावर तयार होणारा हा चिवडा खूपच स्वादिष्ट लागतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पटकन तयार होतो आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चला तर मग लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
भाजलेले मक्याचे पोहे – 2 कप
शेंगदाणे – ½ कप
चणाडाळ – ¼ कप
कढीपत्ता – 10-12 पाने
हिरव्या मिरच्या – 2 बारीक चिरलेल्या
हळद – ½ टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
साखर – 1 टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – 2 टेबलस्पून
किसलेला सुकामेवा – काजू, बदाम
कृती :
मक्याचा चिवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या कढईत थोडं तेल गरम करून घ्या.
यानंतर गरम तेलात शेंगदाणे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून बाजूला काढा.
त्या तेलातच चणाडाळ आणि ऐच्छिक सुकामेवा हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
आता कढईत थोडं तेल घालून त्यात कढीपत्ता, चिरलेल्या मिरच्या, हळद टाका आणि फोडणी द्या.
आता त्यात भाजलेले मक्याचे पोहे टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा.
मीठ, लाल तिखट आणि साखर टाकून सर्व चांगले मिसळा.
शेवटी तयार चिवडा थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.
तुम्हाला हवे असल्यास त्यात थोडेसे खोबरेाचे कापही घालू शकता.
हा चिवडा महिनाभर साठवता येतो, ज्यामुळे जेव्हाही हलकी भूक लागेल तुम्ही या चिवड्याची मजा घेऊ शकता.
सायंकाळच्या चहासोबत किंवा दिवाळी फराळात हा चिवडा आपल्या तोंडाचे चोचले पुरवण्याचे काम करतो.
हेही वाचा :
लवकरच येतील विवाहाचे योग जुळून
क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
राज्यातून मोसमी पावसाची माघार;