दिवाळीत घरातील सर्वच सदस्यांना सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी(healthy) नाश्त्यात नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. कारण दिवाळीमधील तेच तेच फराळातील पदार्थ खायला काहींना आवडत नाही. फराळातील पदार्थांचे अतिसेवन केल्यास अपचन, ऍसिडिटी किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही पनीर टोस्ट (healthy)बनवू शकता. वाढलेले वजन कमी करताना आहारात पनीर खाल्ले जाते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये पनीर टोस्ट बनवण्याची रेसिपी.
साहित्य:
पनीर
शिमला मिरची
कांदा
टोमॅटो
चाट मसाला
मीठ
हिरवी चटणी
बटर
मेयोनीज
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा परफेक्ट पालक-कॉर्न टोस्ट, हेल्दी पदार्थ शरीरासाठी ठरतील पौष्टिक
कृती:
पनीर टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, पनीर आणि इतर भाज्या स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या बारीक चिरून घ्या.मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीरचे तुकडे घेऊन मिक्स करून घ्या.त्यानंतर त्यात मेयोनीज टाकून मिक्स करा. टोमॅटो सॉस, काळीमिरी पावडर,चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.तयार केलेले मिश्रण काहीवेळा बाजूला ठेवा. ब्रेडला हिरवी चटणी एकसमान लावून त्यावर तयार केलेले पनीरचे मिश्रण लावून वरून किसून घेतलेले चीज टाका.तयार केलेला टोस्ट गरम तव्यावर ठेवून बाजूने बटर टाकून व्यवस्थित कुरकुरीत भाजा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीर टोस्ट.पनीर टोस्ट तुम्ही हिरवी चटणी, सॉस किंवा लाल चटणीसोबत खाऊ शकता.
हेही वाचा :
करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलियाच्या साडी लूकने वेधलं सर्वांच लक्ष…
आयुष्यात यश मिळवायचे आहे तर अंगी जपा ‘हा’ गुण; करिअरमध्ये होईल भरारी…
शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही’, रुपाली ठोंबरे संतापल्या…