आपल्या सर्वांनाच कधी ना कधी डोकेदुखीचा(headache) त्रास होतो. कधी कामाचा ताण, कधी अपुरी झोप, तर कधी पाणी कमी पिणं यामुळे डोकं दुखू शकतं. बहुतेक वेळा ही डोकेदुखी काही तासांत आपोआप बरी होते. मात्र, प्रत्येक डोकेदुखीला इतकं सहज घेणं शहाणपणाचं नसतं. अलीकडच्या काही वर्षांत कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत, काही वेदना ‘ब्रेन कॅन्सर’सारख्या गंभीर आजाराचा संकेत देऊ शकतात. ब्रेन कॅन्सरचे लवकर निदान करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण सुरुवातीला त्याची अनेक लक्षणं साध्या डोकेदुखीसारखीच वाटतात. यामुळे खरा फरक लक्षात घेणे कठीण होऊ शकते. वेदनेच्या पद्धतीत, तीव्रतेत आणि इतर लक्षणांमध्ये फरक समजून घेतल्यासच आपण योग्य वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो.

साधी डोकेदुखी आराम केल्याने किंवा औषध घेतल्याने बरी होते. परंतु, जर डोकेदुखी वारंवार होत असेल आणि तीव्रता दिवसेंदिवस वाढत असेल, तर ही चेतावणी समजावी लागते. विशेषतः, मळमळ किंवा उलट्या होत असतील आणि औषधांचा परिणाम होत नसेल, तर सावध राहणे गरजेचे आहे.प्रौढ व्यक्तीला आयुष्यात पहिल्यांदा झटका येणे देखील गंभीर लक्षण मानले जाते. मेंदूमध्ये ट्यूमर असल्यास मेंदूच्या कार्यात अडथळा येतो. यामुळे शरीराच्या एका भागात कंप सुटणे, थरथरणे किंवा बोलताना जीभ अडखळणे यासारखी लक्षणं दिसू शकतात. अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय तपासणी गरजेची ठरते.
ब्रेन कॅन्सर केवळ शारीरिक लक्षणांपुरते मर्यादित नसतो; याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. अचानक चिडचिडेपणा, सतत उदासी, चिंता किंवा विसरभोळेपणा वाढणे हे संकेत होऊ शकतात. ट्यूमरमुळे विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता बिघडू शकते. मेंदूच्या संतुलनावर नियंत्रण ठेवणाऱ्या भागावर दाब पडल्यास तोल जाण्याच्या समस्या सुरू होतात.

यात वारंवार अडखळणे, चक्कर येणे किंवा चालताना त्रास होणे यांचा समावेश होतो. हात-पाय गळाल्यासारखे वाटणे, अशक्तपणा दिसणे हे देखील महत्वाची लक्षणं आहेत. जर वर सांगितलेली लक्षणं फक्त शरीराच्या एकाच बाजूला दिसत असतील उजवा हात किंवा डावा पाय तर हे ट्यूमर असण्याचा ठळक संकेत असू शकतो. साधी डोकेदुखी(headache) बहुतेक वेळा सामान्य असते, परंतु वेदना वेगळी वाटत असेल, वारंवार त्रास होत असेल किंवा असामान्य लक्षणे दिसत असतील, तर ‘थकवा’ म्हणून दुर्लक्ष करू नका.ब्रेन कॅन्सरचा सुरुवातीचा टप्पा ओळखणे कठीण असले तरी, वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक सोपे आणि प्रभावी ठरतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही..
राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार…
दिप-वीरची लेक कोणासारखी दिसते? सत्य आलं समोर