बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांसोबतच त्यांनी एक मोठा सरप्राईज देत, आपल्या लाडक्या लेकीचे, दुआचे , पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या मुलीला आतापर्यंत माध्यमांपासून दूर ठेवले होते. ८ सप्टेंबर २०२४ रोजी दुआचा जन्म झाला होता, तेव्हापासून चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. देशभरातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा (look)पहिल्यांदाच जगासमोर आणला आहे.

या जोडप्याने इंस्टाग्रामवर काही सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यांची मुलगी दुआचाही समावेश आहे. या फोटोंच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दीपिका आणि रणवीर यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलीचे फोटो अशाप्रकारे सार्वजनिक केले आहेत, ज्यामुळे हे फोटो क्षणार्धात व्हायरल झाले.शेअर केलेल्या फोटोंपैकी एका हृदयस्पर्शी फोटोमध्ये, चिमुकली दुआ (look)आई दीपिकाच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोसाठी माय-लेकीने एकाच रंगाचे सुंदर कपडे परिधान केले आहेत. एका फोटोत दीपिका आणि दुआ हात जोडून प्रार्थना करतानाही दिसत आहेत. तर रणवीर सिंहने ऑफ-व्हाईट रंगाचा पारंपरिक पोशाख घातला आहे.

एका चाहत्याने लिहिले, “दुआ दोघांचे मिश्रण आहे. तिचे डोळे आणि डिंपल दीपिकासारखे आहेत, पण हावभाव रणवीरसारखे.” दुसर्‍याने कमेंट केली, “तिला डिंपल आहेत! किती गोड… तिघेही!” तर काहींना ती वडिलांसारखी वाटली. एका युझरने लिहिले, “रणवीरचे डोळे, दीपिकाचे गाल आणि डिंपल(look).काय मस्त मिश्रण आहे!”, तर दुसरा म्हणाला, “मला ती दीपिकाच्या डोळ्यांसहित रणवीर वाटते.” गायिका श्रेया घोषालने कमेंट केली, “देव आशीर्वाद देवो. बाळ दुआ आई-वडिलांचे परफेक्ट मिश्रण आहे.” बिपाशा बासूने लिहिले, “व्वा! दुआ मिनी मम्मासारखी आहे.” आयुष्मान खुरानानेही या फोटोला ‘परफेक्ट मिक्स’ म्हटले.

हेही वाचा :

रोहित शर्माने का घेतली यशस्वी जयसवालची बॅट? कारण समोर आलं!
शिंदे गटाला मोठं खिंडार, ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार…
 प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन…