हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने एक अमिट ठसा उमटवला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे कुलभूषण खरबंदा — ज्यांनी 1980 साली प्रदर्शित झालेल्या ‘शान’ चित्रपटात “शाकाल” या खलनायकाच्या भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये अजरामर ओळख निर्माण केली. त्यांच्या या भूमिकेने खलनायकाची संकल्पना नव्याने परिभाषित केली होती.21 ऑक्टोबर 1944 रोजी पंजाबमधील (आताचा पाकिस्तान) हसन अब्दल येथे जन्मलेल्या कुलभूषण खरबंदा यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि थिएटरमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 60 च्या दशकापासून त्यांनी सिनेमात अभिनय करत अनेक स्मरणीय भूमिका(acting) साकारल्या.

मात्र अलीकडच्या काळात ते ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सिरीजमुळे चर्चेत आले. या सिरीजमध्ये त्यांनी “बाउजी” हे पात्र साकारले — एक बुद्धिमान पण निर्दयी व्यक्तिमत्व. या भूमिकेत त्यांनी आपल्या सुनेशी जवळीक दाखवणारा एक बोल्ड सीन साकारला, ज्यामुळे सोशल मीडियावर (acting)त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.या सीनमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रसिका दुग्गल होती, जिने “बीना त्रिपाठी”ची भूमिका साकारली आहे.

रसिकाने एका मुलाखतीत सांगितले की, “मला हे सीन बोल्ड वाटत नाहीत. पुरुष आणि स्त्री यांच्यातील नातं हे जीवनाचा नैसर्गिक भाग आहे.” वयाच्या 75 व्या वर्षी अशा भूमिकेत दिसल्यामुळे कुलभूषण खरबंदा पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र, त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की, अभिनय म्हणजे मर्यादा ओलांडून वास्तव दाखवण्याची कला, आणि खरबंदा यांनी ती पुन्हा सिद्ध केली आहे.‘शाकाल’पासून ‘बाउजी’पर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे एका अभिनेत्याच्या धाडसाचा आणि बहुआयामीतेचा उत्तम नमुना आहे(acting).

हेही वाचा :

लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार; DCM एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही..
राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार…
दिप-वीरची लेक कोणासारखी दिसते? सत्य आलं समोर