महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. ही योजना(scheme) सुरु झाल्यापासून नेहमीच चर्चेत राहिली आहे. लवकरच लाडक्या बहिणींना भाऊबीजेचा हप्ता मिळणार असल्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. याचबरोबर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालं आहे, आज पाडवा आहे. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आनंदाचे, सुखाचे, समृद्धीचे दिवस येव, अशा सदिच्छा एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत प्रश्न विचारला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी साकारात्मक उत्तर देत थेट हप्त्याचा उल्लेख केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार आहे. लाडकी बहीण योजना(scheme) कायमस्वरूपी सुरू राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीमध्ये पात्र लाडक्या बहिणींच्या घरी लक्ष्मी येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंदीची मागणी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे. कारण RSS हा एख कडवट देशभक्त, राष्ट्रभक्त ही संघटना आहे. कधीही आपत्ती संकट येतं त्यावेळेस RSS ही संघटना धावून जाते. प्रखर राष्ट्र आणि देशभक्तीवर काम करणारी RSS ही संघटना आहे अशा RSS वर बंदी घालावी असं म्हणणं हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर भाई जगताप यांच्यावर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय आणि अधिकार घेत असतो. त्यांचा तो निर्णय असेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा :
राज ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार…
दिप-वीरची लेक कोणासारखी दिसते? सत्य आलं समोर
सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण…