साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. (doctor)उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने वैद्यकीय आणि पोलिस विभागात तुफान चर्चा रंगली आहे. डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर नोट लिहून दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणानंतर साताऱ्याचे वातावरण चांगलेच तापले असून, तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्या गळफास घेऊन जिवण संपवलं. महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या हातावर “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला,” असे शब्द लिहिले होते. ही नोट उघड झाल्यानंतर संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात वाद झाल्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशीही सुरू होती. (doctor)त्यांनी आधीच आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देऊन “माझ्यावर अन्याय होत आहे, मी जीवन संपवेल,” असे म्हटले होते. मात्र, त्याकडे योग्य लक्ष न दिल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. (doctor)त्यांच्या हातावर आढळलेल्या लिखाणामुळे या प्रकरणाचा गुन्हेगारी तपास सुरू झाला असून, पोलिस यंत्रणा पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.या प्रकरणावर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने प्रतिक्रिया देत कठोर कारवाईचे संकेत दिले. “मी एसपींना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. सुसाईड नोट आढळली असल्यास ती अत्यंत खेदजनक बाब आहे. या प्रकरणात सखोल तपास केला जाईल आणि जो दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेला अत्यंत लाजिरवाणी म्हणत दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. “सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना घडणे लज्जास्पद आहे. (doctor)या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी,” असे त्यांनी सांगितले.साताऱ्यातील ही घटना केवळ एका डॉक्टरच्या आत्महत्येपुरती मर्यादित न राहता महिला सुरक्षेच्या प्रश्नाला अधोरेखित करते. या घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ तपास सुरू केला असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या प्रकरणातील पुढील घडामोडींवर केंद्रीत झाले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज; ऑक्टोबरचा हप्त्या ‘या’ दिवशी जमा होणार
सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या