ताज हॉटेलमध्ये पायात कोल्हापुरी चप्पल आणि खुर्चीवर मांडी घालून महिला जेवायला (slippers)बसल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महिलेने खुर्चीवर मांडी घालून बसायला सुरुवात केल्याने ताज हॉटेलच्या मॅनेजरने रोखलं. त्यानंतर नाराज झालेल्या ग्राहक महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खंत व्यक्त केली. या वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलेने कॅप्शनमधूनच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या ग्राहक महिलेने म्हटलं की, ‘मी सर्वसामान्य महिला आहे. मी मेहनत करून पैसे कमावते. आम्ही मोठ्या सन्मानासहित ताज हॉटेलमध्ये येतो. मात्र, आम्हाला आमच्यात देशात अपमान सहन करावा लागत आहे.

‘मी नेहमीच्या पद्मासन पद्धतीने जेवायला बसली,यात माझी चुकी काय? (slippers)मी जेवायला कसं बसावं, हे ताज हॉटेल शिकवणार का? असा सवाल महिलेने केला. व्हिडिओ सुरु झाल्यानंतर महिलेने म्हटलं की, ‘मला खूप राग आला आहे.मी ताज हॉटेलमध्ये आहे. मी माझ्या बहिणीसोबत ताज हॉटेलमध्ये आली होती. आम्ही खूप मेहनतीने पैसे कमावतो. आम्ही दिवाळीचा फारसा काही विचार केला नव्हता. त्यामुळे बहिणीसोबत ताज हॉटेलला रात्रीचं जेवण करायला घेऊन आले’.

महिलेने दावा केला आहे की, ‘मी मांडी घालून जेवायला बसल्यानंतर ताज हॉटेलचे मॅनेजर माझ्याजवळ आले. त्यांनी एका व्यक्तीला तुमच्या जेवणासाठी बसलेल्या पद्धतीवर आक्षेप आहे. (slippers)कारण तुम्ही खुर्चीवर मांडी घालून बसला आहात’.
‘ताज हॉटेलमध्ये भरपूर श्रीमंत लोक येतात. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने बसला. तुमचे पाय जमिनीवर ठेवा. तर पायात क्लोज शुज असायला हवे. मी कोल्हापुरी चप्पल वापरते. त्याच्यावरही आक्षेप आहे का, मी माझ्या मेहनतीच्या पैशांनी कोल्हापुरी चप्पल खरेदी केली आहे. तीच चप्पल घालून आली आहे.

मी खूप मेहनत करते. त्यानंतर या हॉटेलमध्ये आली आहे. (slippers)मी सलवार कुर्ता घालून आले. मी व्यवस्थित कपडे घातले आहेत. त्याच्यावरही आक्षेप आहे का? असा सवाल या महिलेने उपस्थित केला.’मी हॉटेल ताज आणि रतन टाटा यांच्याविषयी मनात खूप आदर आहे. रतन टाटा आमच्या कंपनीचे गुंतवणूकदार आहेत. पण तरीही या हॉटेलच्या मॅनेजरच्या वागणुकीवर नाराज आहे, असेही तिने पुढे सांगितलं.

हेही वाचा :

दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्मा खेळणार नाही

दिवाळी रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकरांच्या इमारतीला आग….

जयसिंगपुरात लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून..