जयसिंगपूर शहरात ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या एका भीषण खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सुनील किसन पाथरवट (वय ३१) या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून(murder) करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. २१) रात्री लक्ष्मीपूजनानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घडली.सणाच्या आनंदात रंगलेल्या जयसिंगपूरकरांवर या घटनेने भीतीचे सावट पसरले आहे. घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.

या खुनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक तपासात काही संशयितांची ओळख पटली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी सुरू केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, अशी माहिती मिळाली आहे.पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलिसांचा विश्वास आहे की आरोपी लवकरच गजाआड होतील.दरम्यान, या घटनेनंतर जयसिंगपूरमध्ये तणावाचं वातावरण असून, नागरिकांमध्ये भीती(murder) आणि संतापाची भावना आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचं आणि तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.


हेही वाचा :
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी….
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी; भरतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर…
साधी डोकेदुखी समजून दुर्लक्ष करताय?, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार