टीम इंडियाचा(Team India) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि दुखापतीचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या स्पर्धांदरम्यान तो वारंवार जखमी होत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आशिया कपदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे हार्दिकला पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्याला मुकावं लागलं होतं.

या दुखापतीनंतर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वनडे आणि टी20 मालिकांसाठी संघात स्थान मिळालं नाही. मात्र आता हार्दिक पांड्या पुन्हा फिट अँड फाईन असल्याचं बीसीसीआयकडून सांगितलं जात आहे. सध्या तो बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस मध्ये रिहॅबिलिटेशन प्रक्रियेत आहे. दिवाळीसाठी काही दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर त्याने 22 ऑक्टोबरपासून पुन्हा प्रशिक्षण सुरू केलं आहे.
रिपोर्टनुसार, हार्दिकला क्वॉड्रिसेप्सच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रियेची गरज नाही आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तो पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे(Team India).त्यामुळे आता त्याच्या पुनरागमनाबाबत क्रीडाप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत, जी 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, हार्दिक पांड्या पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत दिसण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, फलंदाज प्रशिक्षक सीतांशु कोटक यांनी सांगितले, “हार्दिकसारखा खेळाडू संघात नसणं ही मोठी उणीव आहे. मात्र त्याच्या अनुपस्थितीत नितीशसारख्या नव्या खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळते.”चाहत्यांना आता हार्दिकच्या फिटनेस अपडेटची आणि त्याच्या जोरदार पुनरागमनाची आतुरता लागली आहे — कारण टीम इंडियाला मधल्या फळीतील संतुलन देणारा हार्दिकच आहे.
हेही वाचा :
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी; भरतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर…
साधी डोकेदुखी समजून दुर्लक्ष करताय?, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार
वयाच्या 75 व्या वर्षी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पडद्यावर बोल्ड भूमिका