भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची (match)वनडे सीरिज खेळवली जात असून यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. यातील पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेट्सने पराभव झाला. यात तब्बल 8 महिन्यांनी टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पुनरागमन केले. त्यांच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं मात्र दोघेही फ्लॉप ठरले. त्यामुळे आता एडिलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माला प्लेईंग 111 मध्ये संधी दिली जाणार का? याबाबत चर्चा आहे. यावर टीम इंडियाचे बॅटिंग कोच सीतांशु कोटक यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

पर्थ येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सात विकेटने पराभव झाला. आता गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. पर्थ येथील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा हा 8 धावांवर तर विराट कोहली हा शून्य धावांवर बाद झाला होता. टीम इंडियाचे बॅटिंग कोच सीतांशु कोटक यांना विराट आणि रोहितच्या फ्लॉप परफॉर्मन्सबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘रोहित आणि कोहली यांच्या फलंदाजीत काही कमतरता आहेत असे मला वाटत नाही. ते आयपीएलमध्ये खेळले आहेत आणि त्यांनी चांगली तयारी केली आहे. मला वाटते दोघांनाही खूप अनुभव आहे’.
अॅडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या वनडे (match)सामन्यापूर्वी सोशल मीडियावर रोहित शर्माबद्दल असा दावा केला जात होता की त्याला प्लेईंग 11 मधून वगळले जाईल आणि त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी मिळेल, परंतु बॅटिंग कोच सीतांशु कोटक यांनी स्पष्ट केले की रोहित आणि विराट दोघेही सीरिजमधील सर्व सामने खेळतील.टीम इंडियाचे बॅटिंग कोच सीतांशु कोटक यांनी, ‘ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी त्याची (रोहित) तयारी उत्कृष्ट होती. त्यामुळे त्याच्या फॉर्मबद्दल काही चिंता आहेत असे गृहीत धरणे चुकीचं आहे असे मला वाटते’. कोहली आणि रोहित दोघांनीही टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त वनडे सामने खेळतात.

सीतांशु कोटक पुढे म्हणाले की, ‘मला वाटतं ते दोघेही उत्तम (match)फॉर्ममध्ये दिसत आहेत. त्यांनी काल खूप चांगली फलंदाजी केली. प्रत्येक नेट सत्रात त्यांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उत्कृष्ट राहिला आहे’.सीतांशु कोटक म्हणाले की, ‘आम्हाला त्याच्या तयारीची आणि फिटनेसची योग्य माहिती होती. रोहित आणि विराट तो अधूनमधून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला भेट देतो. तिथून आम्हाला अपडेट्स आणि व्हिडिओ मिळतात. ते काय करतायत, त्यांचा सराव, फिटनेस संबंधी काम या सगळ्या संदर्भात आम्हाला माहिती देण्यात आली होती’.
हेही वाचा :
दिवाळी रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकरांच्या इमारतीला आग….
जयसिंगपुरात लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून..
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी….