शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांच्या राहत्या इमारतीत दिवाळीच्या रॉकेटमुळे (Diwali rocket)आग लागल्याची घटना घडली. ही आग इमारतीच्या 22 व्या मजल्यावर लागली आणि घटनास्थळी पोहोचताच वायकर स्वतः आग विझवण्याच्या प्रयत्नात उतरले.आगीच्या वेळी इमारतीच्या फायर सिस्टीममध्ये पाणी नसल्याचे उघड झाल्यानंतर वायकरांनी संताप व्यक्त केला. त्यांनी विचारले की, “नवीन इमारतीमध्ये अशी परिस्थिती असेल, तर इतर इमारतींचे काय? मुंबईतील प्रत्येक इमारतीत फायर सिस्टम तपासली आहे का?”

यंदा दिवाळीत मुंबईत रॉकेटमुळे (Diwali rocket)अनेक इमारतींमध्ये आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावरून वायकरांनी घातक फटाक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी नागरिकांना रॉकेट बॉम्ब इमारतीच्या आजूबाजूला लावू नका आणि दिवाळी सुरक्षितपणे साजरी करा असे आवाहन केले.

दरम्यान, वायकर यांनी दिल्लीतील दिवाळी उत्सवाबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये पहिल्यांदा दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जिथे मुंबईचा सुप्रसिद्ध वडापाव आणि मिसळ अशा पदार्थांचे दीडशे लोकांसाठी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामार्फत महाराष्ट्रातील मराठी समाजासाठी आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर, मुंबई महानगरपालिका आणि फायर ब्रिगेडकडून इमारतींच्या फायर सिस्टीमची तपासणी करण्याची गरज अधिक उठून आली आहे, अशी भूमिका वायकर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
जयसिंगपुरात लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून..
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी….
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी; भरतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर…