कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची “कासेगावच्या स्मशानातलं सोनं “ही कथा वाचलेली नाही(hidden)असा वाचक शोधूनही सापडणार नाही. ते आज हयात असते तर त्यांनी”महाराष्ट्रात भूमी अंतर्गत लपलेलं सोनं’या विषयावर एक कादंबरीच लिहिली असती. सांगायचं तात्पर्य असं की, सोनं हा जगातील सर्वात महागडा धातू आहे. आणि या सोन्याने गेल्या काही महिन्यांपासून आपले दराचे नखरे दाखवायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेत सोन्याचा दर 42 टक्क्यांनी वाढलेला आहे,
युरोपमध्ये तो 38 टक्क्यांनी वाढलेला आहे आणि भारतात मात्र सोन्याचा प्रति दहा ग्रॅम चा दर 148 टक्क्यांनी वाढलेला आहे.

याचा अर्थ सर्वात महाग दर भारतात आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे सोन्याचे दर वाढलेले दिसतात. जगातील सर्वच देश सोन्याचा साठा करतात. (hidden)तेल समृद्ध इस्लामी राष्ट्रांनी सोने खरेदी कडे अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे. कारण त्यांना माहित आहे की, कधी ना कधीतरी इंधनाचे साठे संपुष्टात येणार आहेत तेव्हा भविष्यातील तरतूद म्हणून त्यांनी सोन्याचा साठा करायला सुरुवात केली आहे.”कधीही, कोणत्याही वेळी नड भागवून देईल”अडचणीच्या वेळेला मदतीला धावून येईल. म्हणून भारतामध्ये सर्वसामान्य माणूस सोन्याच्या खरेदीला प्राधान्य देतो. सोन म्हणजे बँक उशाला असल्यासारखे आहे.
अशी मानसिकता भारतीयांची आहे. पण आता सर्वसामान्य माणसासाठी सोनं खरेदी करणे हे एक आता स्वप्न बनले आहे. साधारणतः 20 22 वर्षांपूर्वी सोन्याचा प्रति दहा ग्रॅम चा दर पाच हजार रुपयांच्या आसपास होता. आता तो सव्वा लाखाच्या पुढे गेलेला आहे. या एकूण पार्श्वभूमीवर भारताच्या भूमी अंतर्गत सोन्याचे साठे किती आहेत?(hidden)महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी आहेत का? आणि असल्या तर त्या कुठे आहेत? असे प्रश्न प्रत्येकाला पडलेले आहेत. भारतामध्ये कोलार आणि इतर ठिकाणी सोन्याच्या खाणी होत्या. पण त्यातून सोने काढणे परवडत नसल्याने त्या बंद करण्यात आलेल्या आहेत.पण आता कमी खर्चात जमिनीत लपलेलं सोन बाहेर काढता येऊ शकत. मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक येथे सोन्याच्या खाणी होत्या किंवा आहेत पण सध्या तेथे सोन्यासाठी उत्खनन होताना दिसत नाही.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी,बामणी आणि कोकणातील सिंधुदुर्ग मध्ये सोन्याच्या खाणी असल्याचे संशोधन काही वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. खणी कर्म विभागातील एक सेवानिवृत्त अधिकारी श्रीयुत हजारे यांनी महाराष्ट्रात सोन्याचे विपुल साठे असल्याचे संशोधन केले होते. (hidden)पण त्यांना कोणी गांभीर्याने घेतले नव्हते. राम ताकवले हे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असताना सिंधुदुर्ग मध्ये काही ठिकाणी संशोधन झाले होते.काही ठिकाणी तांबे भरपूर प्रमाणावर असल्याचे सिद्ध झाले होते तर काही ठिकाणी सोन्याचे साठे असल्याचे आढळून आले होते. पण पुढे काही झाले नाही.
वास्तविक सिंधुदुर्ग मध्ये खणीकर्म विभागाच्या वतीने उत्खनन केले तर सोन्याचे साठे मिळू शकतात. तांबे सुद्धा मिळू शकते. ही दोन खनिजे महाराष्ट्राला आर्थिक अडचणीतून बाहेर काढू शकतात.(hidden) सध्या महाराष्ट्रावर नऊ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. उत्खननातून मोठ्या प्रमाणावर सोने उपलब्ध झाले तर महाराष्ट्राचे अर्थकारण गतिमान होऊ शकते.इसवी सन 1984/85 मध्ये केंद्रीय खनिकर्म विभागाच्या शास्त्रज्ञांनी नागपूर जिल्ह्यातील भिवापूर,पुलर, परसौरी, तुथानबोरी,या भागात सर्वेक्षण केले होते तेव्हा तेथे सोने असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र किती साठा आहे हे स्पष्ट होण्यासाठी आणखी सखोल सर्वेक्षण होणे गरजेचे आहे असे खनिकर्म विभागाने केंद्र शासनाला सांगितले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सोन्याचे साठे आहेत. हे काही वर्षांपूर्वीच सिद्ध झाल आहे.पण नंतर केंद्र किंवा राज्य शासनाने गांभीर्याने तेथील सर्वेक्षण करण्यात आले नाही.रामसिंग हजारे या कोल्हापुरातील खंबीर तज्ञाने सोन्याचे साठे असल्याचे सिद्ध करून दाखवले होते. पण त्यांना गांभीर्याने घेतले गेले नाही. (hidden)सोने हा जगातील सर्वात मौल्यवान धातू आहे. भारतातील काही भागात सुवर्णसाठे आहेत. उत्खनन करून सोने बाहेर काढले तर मोठ्या प्रमाणावर विकासासाठी पैसा उपलब्ध होणार आहे. कोणे एकेकाळीभारतात सोन्याचा धूर निघत होता. केंद्रीय आणि राज्य खनि कर्म विभागाने विशेष गांभीर्याने सर्वेक्षण केले तर भारतात पुन्हा सोन्याचा धूर निघू शकतो. “पण केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे”.
हेही वाचा :
दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्मा खेळणार नाही
दिवाळी रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकरांच्या इमारतीला आग….
जयसिंगपुरात लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून..