या वर्षीचा सणासुदीचा काळ भारतीय वाहन उद्योगासाठी ऐतिहासिक ठरला आहे.(brand)नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत देशभरात कार खरेदीची लाट उसळली आहे. तब्बल १० वर्षांतील सर्वाधिक विक्रीची नोंद झाली आहे. या विक्रीच्या शर्यतीत देशातील मोठी कंपनी मारुती सुझुकीने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. या सणासुदीच्या हंगामात मारुती सुझुकीने ३.२५ लाखांहून अधिक वाहनांची विक्री केली असून, कंपनीकडे सुमारे ४.५० लाख नवीन बुकिंग झाल्या आहेत.

या वर्षीचा सणासुदीचा काळ भारतीय वाहन उद्योगासाठी ऐतिहासिक ठरला आहे. नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत देशभरात कार खरेदीची लाट उसळली आहे. तब्बल १० वर्षांतील सर्वाधिक विक्रीची नोंद झाली आहे. (brand)या विक्रीच्या शर्यतीत देशातील मोठी कंपनी मारुती सुझुकीने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. या सणासुदीच्या हंगामात मारुती सुझुकीने ३.२५ लाखांहून अधिक वाहनांची विक्री केली असून, कंपनीकडे सुमारे ४.५० लाख नवीन बुकिंग झाल्या आहेत.
दुसरा निर्णायक घटक म्हणजे बँका आणि वाहन वित्त कंपन्यांनी आकर्षक कर्जदर आणि सुलभ किस्त योजना दिले. त्यामुळे ग्राहकांना नवीन कार घेण्याचा आर्थिक ताण कमी झाला आणि मध्यमवर्गीय खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. माहितीनुसार, या वर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान एकूण कार विक्री मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १५ ते ३५ टक्क्यांनी वाढली आहे.

विशेष म्हणजे, SUVs आणि EVs या दोन श्रेणींची मागणी अधिक उंचावली.(brand) ग्राहक मोठ्या, प्रीमियम आणि ऊर्जा बचत करणाऱ्या वाहनांच्या शोधात असल्याने अनेक कंपन्यांनी त्यांचे नवे मॉडेल्स लाँच करून विक्रीचा वेग आणखी वाढवला. या “फेस्टिव्ह बोनान्झा” दरम्यान फक्त मारुती सुझुकीच नव्हे, तर ह्युंदाई, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि होंडा यांसारख्या वाहन उत्पादक कंपन्यांनीही प्रभावी विक्री कामगिरी केली.
हेही वाचा :
दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्मा खेळणार नाही
दिवाळी रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकरांच्या इमारतीला आग….
जयसिंगपुरात लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून..