आता गुंतवणूकदार त्यांच्या म्युच्युअल फंडात UPI च्या माध्यमातून पेमेंट करु शकतील.(funds)इतकेच नाही तर ते पैसे सुद्धा काढू शकतील. त्यासाठी Pay with Mutual Fund हे फीचर आले आहे. गुंतवणूकदार त्यांच्या लिक्विड फंड होल्डिंग्समधून थेट पेमेंट करू शकतात. ही रक्कम लागलीच वळती होईल. सध्या म्युच्युअल फंड खात्यातून रक्कम काढण्यासाठी अगोदर विनंती पाठवावी लागते. त्यानंतर त्या रक्कमेचे युनिट्स रिडीम होतात आणि मग बँक खात्यात रक्कम जमा होते. पण युपीआयमुळे ही रक्कम लागलीच खात्यात जमा होईल.जर तुमच्याकडे लिक्विड म्युच्युअल फंड असेल आणि फंड हाऊस युपीआय पेमेंट सेवा देत असेल तर फंडची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

सध्या ICICI Prudential Mutual Fund आणि Bajaj Finserv AMC गुंतवणूकदारांना Curie Money च्या माध्यमातून ही सुविधा देत आहेत. हे फीचर लिक्विड फंडचा वापर करण्याची सुविधा देते.(funds) बँक खात्यात रक्कम जमा होताना जो बाजार भाव असेल त्याप्रमाणे परतावा मिळेल.लागलीच लिक्विडिटी : लिक्विड फंड शॉर्ट-टर्म मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक कराल तर लागलीच पैसे उपलब्ध होतात. आता अगोदर बँक खात्यातून रक्कम हस्तांतरीत करण्याची गरज नाही. थेट पेमेंट करता येते.बचत खात्यापेक्षा जोरदार रिटर्न : बचत खात्यावर सर्वसाधारणपणे 4 टक्क्यांहून कमी व्याज मिळते. तर लिक्विड फंडावर 7 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतात.

UPI पेमेंटची सुविधा : आता अनेक लोक दररोज UPI चा वापर करतात. (funds)आता लिक्विड फंड हा थेट स्त्रोत होऊन पैसे काढणे आणि पैसे जमा करता येत आहे. त्यासाठी वेगळे ॲप अथवा बँक हस्तांतरणाची गरज नाही.लवचिक रोख व्यवस्थापन : व्यक्ती आणि व्यवसाय दोघांना शॉर्ट टर्म फंडचा लिक्विड फंड गुंतवणूक ठेवत या पैशांचा वापर करता येईल.तुम्हाला अगदी अल्पकालासाठी पैसा सुरक्षित ठेवायचा असेल. त्यावर थोडीबहुत कमाई हवी असेल आणि कोणतीची जोखीम नको असेल तर मग तुमच्यासाठी बचत खाते चांगले ठरेल. पण जोखीम घेण्याची तयारी असेल तर मग म्युच्युअल फंड चांगले राहिल. बँक खात्यातील 5 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेला विम्याचे संरक्षण असते. तसे म्युच्युअल फंडाला संरक्षण नसते

हेही वाचा :

दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्मा खेळणार नाही

दिवाळी रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकरांच्या इमारतीला आग….

जयसिंगपुरात लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून..