गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी गुरुवारी एका ट्विटद्वारे कॅन्सर उपचार क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, गुगल डीपमाईंडचं “गॅमा AI मॉडेल” आणि याले विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनातून कॅन्सरविरोधात(cancer) लढण्यासाठी नवीन संभाव्य उपचार पद्धती शोधण्यात यश मिळाले आहे.सुंदर पिचाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “AI सायन्समध्ये एक उत्साहवर्धक माईलस्टोन गाठला गेला आहे. आमच्या यालेसोबत तयार केलेल्या C2S-Scale 27B या गॅमा बेस फाउंडेशन मॉडेलनं cancer cellular behavior वर आधारित एक संभाव्य नवीन उपचार पद्धती तयार केली आहे. जिवंत पेशींवर केलेल्या प्रयोगांद्वारे हे निष्कर्ष प्रमाणित झाले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, या संशोधनावर अधिक प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्या झाल्यानंतर, हे मॉडेल कॅन्सरविरोधातील लढ्यात एक नवीन आणि आश्वासक दिशा देऊ शकते.गुगलच्या या घोषणेनंतर(cancer) तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. गुगलचे माजी अभियंता म्हणाले, “AI चा सर्वात मोठा सामाजिक प्रभाव ऑन्कोलॉजीसारख्या मूलभूत विज्ञानातील शोधांना गती देण्यात आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजहितासाठी थेट योगदान देणं हे प्रेरणादायक आहे.”

दुसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया दिली, “हे विज्ञानासाठी AI च्या दिशेने मोठं पाऊल आहे. हे मॉडेल विशेषतः पेशी आणि रेण्वीय जीवशास्त्रासाठी बनवले आहे. 27 अब्ज पॅरामीटर्स असलेले हे मॉडेल खूपच प्रभावी आहे.”तर तिसऱ्या युजरने म्हटले, “कर्करोगाशी लढण्यासाठी ही दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. इतर तांत्रिक प्रयोगांपेक्षा हा उपक्रम खऱ्या अर्थाने मानवतेसाठी उपयोगी ठरणार आहे.”अनेकांनी गुगलच्या या नव्या AI शोधाचे स्वागत करत, कॅन्सरवरील उपचारासाठी जलद आणि अचूक उपाय शोधण्याची ही नवी क्रांती ठरू शकते, अशी आशा व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

फक्त 2 काळ्या मिरीचे 6 आश्चर्यकारक फायदे….
जसप्रीत बुमराहने मियां भाईची अशी उडवली खिल्ली…
शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा…