अहिल्यानगरमध्ये शाळेतच एका विद्यार्थ्याचा(student) खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, एका विद्यार्थ्यानेच ही हत्या केली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

क्रिकेटच्या वादातून विद्यार्थ्याने(student) हे कृत्य केल्याचं समजत आहे. विद्यार्थ्याने चाकूने वार करत हत्या केली. शाळेच्या आवारातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अहिल्यानगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यानेच विद्यार्थ्याचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या सीताराम सारडा विद्यालयातील ही घटना आहे. आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केला आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत. क्रिकेट खेळाच्या करणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं.

शाळेत जेवणाच्या सुट्टीमध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. यादरम्यन आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस सिताराम सारडा विद्यालयात पोहोचले. यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. तसंच हल्ला करणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याला देखील ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा :
उद्या शुक्रवारी बंद राहणार सर्व बँका; जाणून घ्या RBI ने 27 जूनला का दिली आहे सुट्टी
NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल, १५ जुलैपासून लागू होणार नियम
नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका