आजकाल बाजारात भेसळ न करता काहीही मिळणं कठीण झाले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून, त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केमिकल्सचा वापर करून प्लास्टिकची कोबी (cabbage)तयार केली जात आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला असून लोकांमध्ये भीती आणि संताप निर्माण झाला आहे.

इन्स्टाग्राम अकाउंट @mantubabita वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस केमिकल्स वापरून बनावट कोबी तयार करताना दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कोबी इतकी खऱ्या कोबीसारखी दिसते की, पाहणाऱ्याला मूर्ख बनवू शकते. व्हिडीओमध्ये व्यक्ती ती कोबी कापून दाखवत आहे, जी अगदी खऱ्या कोबीसारखी(cabbage) दिसते.

व्हिडीओ शेअर केलेल्या महिलेने लोकांना जागरूक होण्याचं आवाहन केले आहे. तिने सांगितलं की, लोक दैनंदिन जेवणात कोबी वापरतात—पिझ्झा, बर्गर, चायनीज इत्यादीत—म्हणून जर बाजारात बनावट भाज्या येत असतील, तर ही गंभीर परिस्थिती आहे. अन्नपदार्थातील भेसळ आरोग्यास धोकादायक ठरू शकते, म्हणून खरेदी करताना सावधगिरी बाळगावी.

व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी दावा केला आहे की, ही कोबी खाण्यासाठी नाही, तर शोपीस किंवा डिस्प्लेसाठी आहे. काहींनी सांगितले की, “हे हॉटेल मेनू बोर्डसाठी बनवले आहे, खाण्यासाठी नाही.” तरीही हजारो लोक अजूनही या घटनेमुळे चिंतेत आहेत.

हेही वाचा :

अजगरासोबत मस्ती करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, विळखा घालत संपूर्ण शरीर जकडलं अन्…Video Viral
भारतीय घरगुती उपकरणांच्या क्षेत्रात गोदरेज अप्लायंसेन्स आघाडीवर, भारतीय ब्रँडचा नवा अभिमान!
केंद्र सरकारने रुग्णालयांसाठी लागू केली नवीन दररचना….