भारतातील घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात भारतीय उत्पादन(Godrej) असणारा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणजे Godrej Appliances आहे. हे Godrej & Boyce या भारतीय कंपनीचे एक महत्त्वाचे विभाग असून, देशातील ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळकटी देणारा हा अग्रगण्य उद्योग आहे.

2024-25 या आर्थिक वर्षात गोदरेज अप्लायंसेन्सने तब्बल ₹6,000 कोटींचा महसूल नोंदवला असून, कंपनीने 2025-26 साठी ₹10,000 कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट ठरवले आहे. भारतीय घरगुती उपकरणांच्या बाजारपेठेत ही कामगिरी एक मोठा टप्पा मानली जात आहे. गोदरेज (Godrej)अप्लायंसेन्सच्या उत्पादनांमध्ये रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, किचन उपकरणे यांचा समावेश असून, ही सर्व उत्पादने भारतीय वातावरण आणि वीज वोल्टेजच्या अनुकूलतेनुसार डिझाईन केली गेली आहेत. त्यामुळेच भारतीय ग्राहकांमध्ये या ब्रँडवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.

दुसरीकडे LG Electronics India आणि Samsung India सारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर कार्यरत असले तरी, भारतीय उत्पादनाच्या बाबतीत गोदरेजने आपली मजबूत ओळख कायम ठेवली आहे. विशेषतः LG Electronics India ने 2025 मध्ये ₹1.16 लाख कोटींच्या बाजारमूल्याने आपली पहिली सार्वजनिक ऑफरिंग (IPO) यशस्वी केली असली, तरी भारतीय बनावटीच्या उत्पादनात गोदरेजचा दबदबा कायम आहे.

गोदरेज अप्लायंसेन्स केवळ एक ब्रँड नाही, तर भारतीय आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनले आहे. देशात बनवलेले आणि देशासाठी बनवलेले हे उत्पादने भारतीय ग्राहकांचा अभिमान आहेत.

👉 तुम्हाला जर गोदरेज चा कोणताही प्रॉडक्ट खरेदी करायचा असेल, तर इचलकरंजी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गजराज बॅटरी शेजारी असलेल्या “गोदरेज(Godrej) ब्रँड शॉपी, इचलकरंजी” या ठिकाणावरूनच गोदरेजचे प्रॉडक्ट खरेदी करा.इथे तुम्हाला सर्व प्रकारचे गोदरेज प्रॉडक्ट्स — किफायतशीर दरात, उत्तम गुणवत्तेसह आणि आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत.

हेही वाचा :

आध्यात्मिक गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार….
दोन दिवसांच्या नवजात बाळाची विक्री! आईनेच केला ५० हजारात सौदा…
4 बस, 500 मुलं, 8 तासात 3 KM प्रवास.. राज ठाकरेंचा 1 फोन आला अन्.. ‘त्या’ रात्री नेमकं घडलं काय?