भारत विविधतापूर्ण अशा या देशात प्रांतानुसरा खाद्यसंस्कृतीसुद्धा बदलते. इथं एका राज्यातसुद्धा अनेक आहारपद्धती आढळतात. खाद्यसंस्कृतीमध्ये असणापरी ही विविधता, ते तयार करण्याती पद्धत पाहता जगभरातूनही भारतीय जेवणाचं कौतुक वाटतं. परदेशी नागरिकांसाठी तर भारतीय जेवण(food) कुतूहलाचा विषय ठरते. किंबहुना परदेशात असणाऱ्या भारतीयांसाठी मायदेशी परतल्यावर घरच्या जेवणावर ताव मारणं हा एकमेव मुख्य हेतू असतो असं म्हणणंही अतिशयोक्ती ठरणार नाही.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या एका अहवालातून चवदार भारतीय जेवणातून आरोग्याला असणारा धोका अधोरेखित करण्यात आला आहे. भारतात तयार होणाऱ्या आहारामध्ये कार्बोदके अर्थात कार्बोहायड्रेचचं प्रमाण अधिक असून प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. ज्यामुळं या देशात स्थूलता, मधुमेह, स्नायुंमध्ये कमकुवतपणा, अशक्तपणा अशा समस्या अनेकामध्ये जाणवतात.

ICMR आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशननं दिलेल्या माहितीनुसार भारतीयांच्या आहारात 65 ते 70 टक्के कार्बोहायड्रेट असतात. तर, प्रोटिनचं प्रमाण 10 टक्के इतकं असतं. थोडक्यात इथं नागरिकांचं पोट भरतं, मात्र त्यांच्या शरीरास पोषक घटक मात्र पुरवले जात नाहीत. अहवालानुसार भारतीय(food) थालीमध्ये भात, चपाती, बटाटे अशा रुपात कार्बोदकांचा समावेश असतो. वरील पदार्थांच्या सेवनामुळं शरीरात साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं शरीर चरबी साठवण्यास सुरुवात करतं. याच कारणामुळं वजन वाढतं आणि सततचा थकवा, मधुमेहासारख्या समस्या शरीरावर आघात करतात.

वरील अहवालानुसार भारतात दर दिवशी एक व्यक्ती दिवसाला 35 ते 40 ग्राम प्रोटिनचं सेवन करतं. प्रत्यक्षात ही गरज 60 ग्राम इतकी आहे. बहुतांश भारतीयांच्या ताटातून डाळ, दूध, अंड आणि सोयाबिन असे घटक दिसेनासे होत आहेत, जे प्रामुख्यानं प्रथिनांचे स्त्रोत आहेत. याचा थेट परिणाम अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती आणि स्नायूंच्या ताकदीवर होत आहे. आयसीएमआरच्या संशोधनानुसार दक्षिण भारतातील नागरिकांचा मुख्य आहार घटत तांदूळ, भात असून उत्तर भारतात गव्हाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तर, पूर्वोत्तर आणि किनारपट्टी राज्यांमध्ये मासे आणि नारळापासून प्रथिनांची गरज भागवली जाते. मात्र देशभरात आहारामध्ये असंतुलन आहे हीच वस्तूस्थिती.

आयसीएमआरनं नागरिकांना आहाराच्या सवयींमध्ये तातडीनं बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहवालानुसार जर आहारात धान्यासमवेत प्रथिनं आणि आरोग्यदायी स्निग्ध घटकांचा(food) समावेश केला नाही, तर आगामी काळात आजारपण शरीरावर आघात करु शकतं. या अहवालात दिलेला आणखी एक सल्ला म्हणजे, कायम एका व्यक्तीच्या ताटात 25 टक्के प्रथिनं, 50 टक्के कार्बोदके , 25 टक्के आरोग्यास पूरक स्निग्ध घटक असं संतुलन राखणं गरजेचं आहे. त्यामुळं दर दिवशी आहारात दूध, डाळी, अंड, दही, सोया यांचा समावेश अनिवार्य आहे.

हेही वाचा :

PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता पेन्शन खातं होणार मालामाल…
कोल्हापूरातील वसतिगृह मारहाण प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल…
बहिणीला बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये पाहिलं, भावाला राग अनावर, हॉकी स्टिक काढली अन्…